नेत्यांच्या प्रकृती स्वास्थासाठी मोहटादेवीला साकडे - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

मंगळवार, ११ मे, २०२१

नेत्यांच्या प्रकृती स्वास्थासाठी मोहटादेवीला साकडे

चांदा येथील मोहोटादेवी मंदिरात प्रशांत गडाख यांच्या कार्यकर्त्यांची प्रार्थना
 
चांदा / जलभूमी वृत्तसेवा 
नेवासा तालुक्यातील चांदा येथे जिल्हयाचे युवा नेते प्रशांतभाऊ गडाख यांच्या प्रकृती स्वास्थासाठी जगदंबा मोहोटादेवी मंदिरात मनोभावे प्रार्थना करून आरती करण्यात आली. 
 
 
गेली काही दिवसापासून जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत भाऊ गडाख यांची प्रकृती खालावल्यान त्यांना मुबईतील रुग्णालयात उपचार चालु आहेत . नेवासा तालुक्यातील युवावर्गात प्रशांत भाऊंची मोठी क्रेझ आहे. नामदार शंकरराव गडाखांच्या बरोबर लक्ष्मणा सारखी साथ देणाऱ्या प्रशांत भाऊंच्या प्रकृती स्वास्थासाठी तालुक्यात ठिकठिकाणी प्रार्थना होत असताना मंगळवारी चांदा येथील जगदंबा मोहोटादेवी मंदिरात ही मनोभावे पुजा करुन प्रार्थना करण्यात आली. 
 
त्यानंतर देवी मातेची आरती करण्यात आली.यावेळी गावचे माजी सरपंच संजय भगत, गडाख समर्थक विजय रक्ताटे, अमित रासने, कांदा आडतदार पप्पू दहातोंडे, माजी ग्रा .प . सदस्य रविंद्र जावळे, पत्रकार अरुण सोनकर, अशोक आखाडे, ब्रम्हवृंद तुषार जोशी आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...