शिव रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरणासाठी पुढा-याचे उंबरठे झिजविले - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

मंगळवार, ११ मे, २०२१

शिव रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरणासाठी पुढा-याचे उंबरठे झिजविले

रस्ताप्रश्नी करजगावकरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
 

आंबी/ जलभूमी वृत्तसेवा 

 

राहुरी तालुक्यातील करजगाव - जातप शिव रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण होण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा पुढाऱ्यांचे उंबरठे झिजवले. अद्यापही रस्त्याचे काम मार्गी न लागल्याने करजगाव ग्रामस्थांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना साकडे घातले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, करजगाव - जातप शिवरस्ता देवळाली प्रवरा, राहुरी बाजारपेठेशी जोडणारा मुख्य रस्ता आहे. विद्यार्थी, रुग्ण, नोकरदार, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी यांना दैनंदिन जीवनात याच रस्त्याचा वापर करावा लागतो. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या रस्त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. ही खेदाची बाब आहे. या रस्त्याची बिकट अवस्था झाली असून दैनंदिन दळणवळणासाठी रस्ता अत्यंत अडचणीचा बनला आहे. 

 


करजगाव : दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला करजगाव - जातप शिवरस्ता. 
(छाया : योगेश आरंगळे,जलभूमी सेवा )

 

सदर रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी खडीकरण, डांबरीकरण करावे. अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती वेणूनाथ कोतकर, सरपंच शनिफभाई पठाण, माजी सरपंच नवनाथ कोतकर, उपसरपंच गणेश कोतकर, सोसायटीचे माजी अध्यक्ष सुरेश कोतकर, बाबासाहेब कोतकर, रामेश्वर कोतकर, साईनाथ कातोरे, माजी सरपंच बाबासाहेब आरंगळे, इस्माईल पठाण, पंढरीनाथ कोतकर, भैय्या पठाण, योगेश आरंगळे, चांदभाई पठाण, आदिनाथ आरंगळे, त्रिंबक कोतकर, रमजान पठाण, याकूब पठाण, एजाज पठाण, अण्णासाहेब देठे, सचिन लोंढे, दीपक कोतकर आदी ग्रामस्थांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...