वृक्षारोपण करून केले अस्थिविसर्जन
खर्डा / जलभूमी वृत्तसेवा
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील गोपाळघरे परिवाराने परंपरेनुसार रक्षा नदी पत्रातून विसर्जन न करता त्यांनी घराजवळील शेतामध्ये वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याचे संकल्प करण्यात आले. अस्थीविसर्जन नदीपात्रात किंवा इतर जलाशयामध्ये न करता वृक्षारोपणासाठी खोदलेल्या खड्यात रक्षा विसर्जित करून वृक्षारोपण करण्यात आले.
सध्या कोरोना या महामारी आजारामुळे जिल्हा बंदी असल्याकारणाने राख (रक्षा) तिर्थस्थळी, नदी मध्ये टाकुन नदीचे प्रदूर्शन होते. ते ही थांबेल व आज कोरोना रुग्नांना ऑक्सीजन ची आवश्यकता व त्याचे महत्व कळू लागले. या नातवांनी आपल्या आजोबांची कायम आठवण रहावी म्हणुन घरासमोरील शेतामध्ये मोठे खड्डे करून राख टाकुन वृक्ष लागवड करण्यात आले. नानासाहेब गणपती गोपाळघरे यांचे वयाच्या 90 वर्षी नुकतेच वृद्धापकलाने निधन झाले.
आमचे आजोबा वटवृक्ष - गोपाळघरे
आमचे आजोबा आमच्या कुटुंबा साठी व नातेवाईकांसाठी वटवृक्षासारखा आधार वाटत होते. त्या रोपट्यांच जतन करून त्यांचा वटवृक्ष करून झाडांची सावली व फळे इतरांसाठी उपयोगी पडतात तसेच आजोबांनी चांगल्या विचारांची दिलेली शिकवण व त्यांचे संस्कार समाजासाठी कामी येतील.
- तुळशीदास गोपाळघरे ,
खर्डा नातू


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...