पहिल्या लाटेत मदत करणारे गावपुढारी झाले गायब ? - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

रविवार, २५ एप्रिल, २०२१

पहिल्या लाटेत मदत करणारे गावपुढारी झाले गायब ?

निवडणूका डोळ्यासमोर ठेवून करत होते मदत चर्चेला उधाण
 
अविनाश गर्डे 
 जायकवाडी / जलभूमी वृत्तसेवा 
 
मागील वर्षी कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर लोकांना खायला काही नाही. केंद्र शासनापासून तर गावातील ग्रामपंचायतीनेदेखील फूल नव्हे, तर फुलाची पाकळी म्हणून मदत केली. सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व समाजातील धनाढ्य व्यक्तींनी गोरगरिबांना, गरजूंना, विधवा, यांना अन्नधान्य, तेल, तिखट, मीठ, तांदूळ, गव्हाचे पीठ, जेवण अशा विविध वस्तू गोरगरिबांना वाटप केल्या. 
 

जणू हे वाटप करण्याची पैजच लागली असावी. असे चित्र होते. पहिल्या लाटेत मदत करणारे गावपुढारी आता कुठे गायब झाले ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे. ग्रामपंचायत निवडणूका डोळ्यासमोर ठेवून करत होते मदत अशा चर्चेला उधाण आले आहे. मागच्या वर्षी लाॅकडाऊन सुरू झाले. गोरगरिबांनी पैसे कमविले. त्यांच्याजवळ पैसेही होते तरीही त्यांना मदत करण्यात आली होती. यंदा कोरोनामुळे कुणाकडे पैसे नसताना गोरगरिबांना या कोरोनाचा संकटाचा सामना करताना पोटाचा प्रश्न आड येत आहे. 
 
ही मदत तोकड्या लोकांनाच मिळणार आहे. उर्वरित गोरगरिबांच्या मदतीसाठी लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील लोकांना आता दोन वेळच्या जेवनाची समस्या भेडसावत आहे. एकीकडे कोरोनाचा कहर, तर दुसरीकडे पोटाचा प्रश्न भेडसावत आहे. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदत करून फोटो प्रकाशित करणाऱ्यांनी यंदा का मदतीसाठी हात पुढे केला नाही. मागच्या वर्षी गोरगरिबांना दिलेले धान्य आताही त्यांच्याकडून संपले नसावेत असा तर धान्य देणारे विचार करीत नाही ना, असा सवाल उपिस्थत होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...