महसूलमंत्री ना.थोरातांची ज्ञानेश्वर समुहास सदिच्छा भेट
नेवासा / जलभूमी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांंनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल शनिवारी दि. २४ रोजी अहमदनगर, पाथर्डी, शेवगांव दौरा करून संगमनेर कडे जात असताना ना. थोरात यांनी भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पा. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाण्यास सदिच्छा भेट दिली.
हा दौरा राजकीय नसला तरी आघाडी धर्म पाळत कारखान्यावर जावून माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची भेट घेवून चर्चा झाली. या भेटीत ना. थोरात यांनी घुले बंधूकडून जिल्ह्यातील कोरोना संदर्भात आढावा घेतला असल्याचे सांगण्यात आले.
लोकनेते मारूतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना समुहाच्या वतीने महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे स्वागत करुन सत्कार करताना कारखान्याचे अध्यक्ष डॉ. नरेंद्रजी घुले पा. या प्रसंगी आ.सुधीर तांबे, माजी आ. चंद्रशेखर घुले पा., पांडुरंग अभंग, काकासाहेब नरवडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...