पंचायत समितीचे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी भानुदास अडसुरे यांचे निधन - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

सोमवार, १७ मे, २०२१

पंचायत समितीचे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी भानुदास अडसुरे यांचे निधन

अडसुरे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे
 

चांदा / जलभूमी प्रतिनिधी 

 

नेवासा तालुक्यातील मुळचे चांदा येथील रहिवासी असलेले मात्र नोकरी निमित्ताने नेवासा येथे स्थायिक झालेले नेवासा पंचायत समितीचे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी भानुदास देवराव अडसुरे ( वय ७५ ) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.

 

 
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पुतणे, एक भाऊ असा मोठा परीवार आहे . नेवासा पंचायत समितीत गटविकास अधिकारी असताना त्यांनी अनेक नवनवीन योजनांद्वारे विविध संकल्पना अतीशय यशस्वीपणे राबविल्या होत्या . माजी खासदार आणि जिल्हयाचे नेते साहित्यीक यशवंतराव गडाख यांचे ते वर्गमित्र होते. इंजिनिअर निलेश व नेवासा कोर्टातील प्रसिद्ध वकिल अ‌ॅड. नितीन अडसुरे यांचे ते वडिल होत. तर चांदा गटाचे जिल्हा परिषद सदस्य अनिलराव अडसुरे यांचे ते चुलते होत. एकत्र कुटुंब पध्दती त्यांनी अतिशय नियोजनबध्द पध्दतीने अनेक वर्ष चालविली. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...