आप्पासाहेब मला सोडवा..! कोविड रुग्णाची आर्त हाक - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

सोमवार, १७ मे, २०२१

आप्पासाहेब मला सोडवा..! कोविड रुग्णाची आर्त हाक

खासगी कोविड सेंटर कडून रुग्णांची अक्षरशः लूट..!
 

राहुरी विद्यापीठ/ जलभूमी वृतसेवा 

 

देवळाली प्रवरा नगरपालिका इमारतीमध्ये सुरू असलेल्या खासगी कोविड सेंटर कडून रुग्णांची अक्षरशः लूट सुरु आहे. दि. १७ मे रोजी दुपारी २.१२ वाजता आप्पासाहेब मला सोडवा अशी आर्त हाक देणारा फोन आला. पलीकडून बोलणारी व्यक्ती ही परदेशातील नसून देवळाली प्रवरा हद्दीतील राहुरी फॅक्टरी च्या गजानन वसाहती मधील गरीब कुटुंबातील अतुल रमेश बाविस्कर होते. आप्पासाहेब मला येथून सोडवा हो. तुमचे फार उपकार होतील. 

 

 

मी देवळाली प्रवरा येथील शनी मंदिरासमोर असलेल्या कोविड सेंटर मध्ये बुधवार पासून ऍडमिट आहे. मला रेमडेसीविर इंजेक्शन दिले नाही, ऑक्सिजन सुद्धा लावले नाही, तरी सुद्धा ४ दिवसाचे ४० हजार रुपये बिल काढले आहे. माझेकडे बिल भरायला पैसे नाहीत, कृपया मला मदत करा, मला येथून बाहेर काढा..! असे हृदय पिळवटून टाकणारे शब्द ऐकून या कोविड सेंटर मध्ये रुग्णांची किती लूट चालू आहे हे स्पस्ट होते. आत्तापर्यंत या कोविड सेंटर मध्ये रुग्णांची आर्थिक लूट होते हे फक्त ऐकले होते. आज मात्र प्रत्यक्ष अनुभव आला. 

 

खूपच धक्कादायक, एकीकडे कोरोना रुग्णांची मदत करण्यासाठी कित्येक दानशूर व्यक्ती, संस्था समोर येत असताना कोरोना रुग्णांच्या मढ्यावर बसून खाणारी ही मंडळी हे पाप कुठे फेडणार. संपूर्ण देवळाली प्रवरा पंचक्रोशीत या कोविड सेंटरची व त्यामधील गलथान कारभाराची आणि नागरिकांना जास्त बिल आकारून कसे लुटले जाते याची चर्चा सुरू आहे, यांनी अक्षरशः कोरोना रुग्णांचा या ठिकाणी धंदा मांडला आहे. 

 

जिल्हाधिकारी यांनी तात्काळ देवळाली प्रवरा येथील या खाजगी कोविड सेंटरची चौकशी करावी. यामध्ये अडकलेल्या रुग्णांना दिलासा द्यावा. अन्यथा या कोविड सेंटर मध्ये घुसून येथे बिला अभावी अडकलेले रुग्ण आम्ही बाहेर काढू असा इशारा यावेळी देण्यात आला. 

 


कोविड सेंटर शासनाने ताब्यात घ्यावे- ढुस

 खाजगी कोविड सेंटरची तात्काळ चौकशी करून हे कोविड सेंटर शासनाने ताब्यात घ्यावे. आमच्या मागणी मान्य न केल्यास देवळाली प्रवरा मध्ये तीव्र स्वरूपाचे चले जाव आंदोलन उभारले जाईल, याची नोंद घ्यावी. 

आप्पासाहेब ढुस,
देवळाली प्रवरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...