आमदार आजबे यांची नायगाव आरोग्य केंद्राला भेट - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, १ मे, २०२१

आमदार आजबे यांची नायगाव आरोग्य केंद्राला भेट

नितीन भोंडवे
पाटोदा / जलभूमी वृत्तसेवा
सध्या देशावर कोरोनाच संकट असून दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन केले आहे .आमदार आजबे व त्यांचे सहकारी यांच्या मार्फत तालुक्यात ठिकठिकाणी उपाययोजना  राबविण्यात येत आहेत. नायगाव येथील आरोग्य केंद्रात गेल्या काही दिवसापासून अँटीजन टेस्ट किट उपलब्ध नसल्यामुळे अनेक विविध समस्यांबाबत युवा नेते बाळासाहेब खोमणे यांनी आमदार आजबे यांना माहिती देऊन भेट देण्यास विनंती करण्यात आली होती. 
या सर्व अडचणी लक्षात घेत. आमदार आजबे यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली.त्यावेळी आरोग्य केंद्रा मधील समस्यां बाबत आढावा बैठक घेण्यात आली. व समस्या बाबत चर्चा करण्यात आली.  यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. काकड, डॉ. गुंड, पाटोदा पोलीस स्टेशन चे कॉन्स्टेबल मोटे, युवा नेतृत्व बाळासाहेब खोमणे, इंजि. किरण भोंडवे, नानासाहेब इंगोले, श्रीकांत कुडके, दीपक खोमणे, प्रशांत गाडे, शिवाजी भोसले, गणेश खोमणे, श्रीराम तुपे, शहादेव भोंडवे, योगेश भोसले, पत्रकार नितिन भोंडवे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...