प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुकाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, १ मे, २०२१

प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुकाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर

 तुषार महाजन 
शिर्डी/ जलभूमी वृत्तसेवा

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुकाच्या वतीने रक्तदान शिबिराचे साई संस्थान ब्लड बँक शिर्डी येथे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारीत निर्माण झालेला रक्ताचा प्रचंड तुटवडा भरून काढण्यासाठी त्याचप्रमाणे आगामी काळात सुरू होणारे कोविड लसीकरनंतर कोणत्याच तरुणाला तब्बल सहा महिने रक्तदान देता येणार नाही अर्थातच एकीकडे कोविडची महामारी आणि त्यातच या महामारीच्या काळात राज्यात रक्ताची तीव्र समस्या निर्माण होऊ शकते असे राज्यमंत्री श्री बच्चुभाऊ कडू यांचे संकेत मिळताच ; प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती राहाता तालुका, यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त रक्तदान शिबीर घेतले. 
साईबाबा सुपर हॉस्पिटल शिर्डी येथील साईनाथ रक्तपेढी येथे सर्व कोरोना नियमांचे पालन करत, सोसिएल डिस्टनसिंगमध्ये राहाता तालुक्यातील मोठ्या संख्येने प्रहारच्या मावळ्यांनी रक्तदानाचा ध्यास घेत रक्तदान मोहीम पार पाडली. यावेळी राहाता तालुका प्रहार सैनिकांनी रक्ताला नसते कोणतीही जात न पात , आणि म्हणूनच एक आणि एकच आहे रक्तदान जे करते सर्व जाती धर्मांवर मात असा नारा देत रक्तदान शिबिरास सुरुवात केली. विशेष बाब म्हणजे प्रहारच्या दिव्यांग बांधवांनी देखील पुढे येऊन रक्तदान केले . प्रहारकडून शिर्डी येथील रक्तपेढीला केलेल्या या अनमोल रक्तदानातुन कोविडं काळात शिर्डी सुपर हॉस्पिटल तसेच कोविडं सेंटर आणि राहता तालुक्यातील इतर कोविडं सेंटर यामधील शेकडो लोकांचे प्राण वाचणार आहेत. प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुका यांच्या वतीने गरजेच्या वेळी अत्यंत काळजीवाहू परिस्थितीमध्ये तालुक्यात विविध ठिकाणी आजवर अनेकदा असेचं रक्तदान शिबीर घेण्यात आली आहेत. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक अभिजित कालेकर, जिल्हा सरचिटणीस अभिजित पाचोरे, प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुकाध्यक्ष दिनेशराजे शेळके पाटील, तालुका उपाध्यक्ष विजय काकडे, दिपक घोगरे, अशोकराव खंडांगळे, प्रहार लोणी खुर्द शहर अध्यक्ष तथा लोणीचे उप-सरपंच अनिल आहेर, संघटक श्री. वसंतराव काळे, अमोल कडू , विद्यार्थी संघटना राहाता तालुकाध्यक्ष रोमचंद कडू , राहाता शहर प्रमुख अविभाऊ सनासे, समनवयक जगन्नाथ सरोदे, अस्तगाव शाखा प्रमुख मंगेश नळे, निमगाव शाखेचे उपाध्यक्ष श्री.सचिन आरने तसेच प्रहार दिव्यांग क्रांतीचे राहाता तालुकाध्यक्ष भाऊंनाथ गमे, उपाध्यक्ष नितिन भन्साळी, विशाल दाभाडे, सोमनाथ ठोंबरे, लहू निठवे, महेंद्र भोरे, शुभम नळे, हर्षवर्धन चौधरी आदी प्रहार पदाधिकाऱ्यांच्या अनमोल सहकार्यातून रक्तदान शिबीराचा कार्यक्रम यशस्वी झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...