संदिप पाळंदे
आंबी / जलभूमी वृत्तसेवा
अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा प्रमुख जिल्हा मार्ग क्रं - २६ रामपूर- कोल्हार खुर्द -चिंचोली - गंगापूर - दवणगाव - आंबी - अंमळनेर - चांदेगाव हा सुमारे १७ किलोमीटर लांबीचा रस्ता दुरुस्त होण्यासाठी आ. लहू कानडे सतत पाठपुरावा करत होते. सदरचा रस्ता हा अत्यंत खराब झाल्यामुळे परीसरातील नागरीकांची प्रचंड गैरसोय व हाल होत असत. आ. लहू कानडे हा रस्ता तात्काळ दुरुस्त व्हावा. यासाठी सतत प्रयत्नशील होते. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी सुमारे पाच कोटी रुपये निधी मंजूर झाल्याचे पत्र केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच आमदार लहू कानडे यांना पाठवले आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये समाविष्ट राहुरी तालुक्यातील ३२ गावांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता असल्यामुळे व सदरचा रस्ता बऱ्याच वर्षांपासून दुरुस्त न केल्यामुळे अत्यंत खराब झाला होता. या परीसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी होती. या मागणीचा विचार करून आ. कानडे यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीप्रश्नी निधी मंजूर होण्यासाठी सुरवातीपासून पाठपुरावा केला व तात्काळ निधी मिळणेसाठी मागणी केली होती. अखेर आ. लहू कानडे यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त होऊन या १७ कि.मी. लांबीच्या रस्त्यासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. सदरचा रस्ता केंद्रीय रस्ते दुरुस्ती (सी आय आर एफ) अंतर्गत मंजूर झाला असून केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी त्यास मान्यता दिली आहे. या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतची पुढील कार्यवाही सुरु केली असून लवकरच या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरु होणार असल्याने या परिसरातील सर्व नागरिकांनी आनंद व्यक्त करीत आ. लहू कानडे यांचे आभार मानले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...