बोरी फाटा / जलभूमी प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील वांजुळपोई येथील संपत बाबुराव पवार (सावकार) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मृत्यूसमयी ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन पत्नी, पाच मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार असून वांजुळपोई सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...