सोशल मिडीयातून नागरीकांचे आ.राजळेंना खुले आव्हान
आ. राजळे व ढाकणे शीतयुद्ध; आगामी निवडणूका रंगणार
नगर/ जलभूमी वृत्तसेवा
------------------------
शेवगाव- पाथर्डी विधानसभा सदस्या आ.मोनिकाताई राजळे यांनी पाथर्डी तालुक्यात रस्ता कामाचे भूमिपूजन प्रसंगी विरोधकांवर टिकेची झोड उठवली. यावेळी बोलताना आ.राजळे म्हणाल्या की, निवडणूका आल्यावरच विरोधक जागे होतात. मी मतदारसंघात केलेला विकास बघायचा असेल तर माझ्या गाडीत बसून चला मी विकासकामे कुठे कुठे केली ते दाखवते. या आवाहनाला विरोधी कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयातून मोनिकाताई मतदारसंघात केलेला विकास दाखवाच असे खुले आवाहन दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आ.मोनिकाताई राजळे यांनी माणिकदौंडी परिसरातील अत्यंत दुर्गम भागातील सोनळवाडी तसेच आल्हणवाडी येथील काकड दरा येथे रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला.
त्यावेळी आ. राजळे यांनी विरोधकांचा चांंगलाच समाचार घेतला असल्याचे बोललेे जाते. विरोधक फक्त निवडणुका तोंडावर आल्यावर जागे होतात. विरोधकांच्या कारखान्याशेजारी रस्ता केला. त्या सर्व कामाबद्दल सर्व प्रथम तुमचे आभार सोशल मिडीयातून मानण्यात आले. मात्र त्या कार्यकर्त्यांने सोशल मिडीयातून मेसेज शेअर करून प्रतिसवाल विचारण्यात आला.गेल्या दोन पंचवार्षिक आमदार तुम्हीच. मागच्या वेळी सरकार तुमचेच होते. त्याच्या अगोदर पण आमदार की तुमच्या घरात होती. मग तुमच्या भाषेत त्या दुर्गम भागात विकास नेमका कोणी करायला हवा होता. विरोधकांनी ? कारखान्याशेजारी रस्ता केला मग तो परिसर तुमच्या मतदार संघात येत नाही का ? आणि तुम्ही म्हणताय कि, मी केलेला विकास पाहण्यासाठी माझ्या गाडीत बसून पहा.
मी म्हणतो पाहूच. कधी पहायचा ते तुम्ही ठरवा. मतदार संघातील सर्व पत्रकार, ज्येष्ठ नागरिक व काही सर्वपक्षीय युवा नेते सोबत घेऊन तुम्ही केलेला विकास पाहू. असेल तयारी तर वेळ आणि तारीख तुम्ही ठरवा. आम्ही तयार आहोत. असे जाहीर आवाहन सोशल मिडीयातून मेसेजव्दारे देण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.विषय नं.- २ एखादे कोविड सेंटर सुरू केले म्हणजे काही मोठे काम नाही, असेही तुम्ही म्हणाल्या. ठीक आहे. नसेल मोठे काम. पण तुम्हाला सरकारने कोरोनासाठी एक कोटी रुपये निधी दिला. तो कुठे खर्च करण्यात आला. हे समजून सांगितले असते तर कदाचित आम्ही समजलो असतो.
पण ते ही आपण सांगितले नाही. विकास कामे पाहण्यासाठी भेटल्यावर सांगितले तरी चालेल.आणि हो वेळ आणि तारीख जाहीर करा.अशी विनंतीही मेसेजव्दारे करण्यात आली आहे. पाहूया आ.राजळे या संदर्भात कोणती भूमिका घेतात.आ.राजळे व प्रताप ढाकणे यांचे निवडणूकीअगोदरच आरोप प्रतिआरोपाच्या फे-या झडू लागल्या असल्याने आगामी निडणूका रंगतदार होणार असल्याचे मानले जाते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...