देवगड देवस्थांंनचे महंत गुरुवर्य भास्करगीरीजी महाराज यांच्या हस्ते दैनिक जलभूमी ( कलर ) अंकाचे प्रकाशन - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

देवगड देवस्थांंनचे महंत गुरुवर्य भास्करगीरीजी महाराज यांच्या हस्ते दैनिक जलभूमी ( कलर ) अंकाचे प्रकाशन

वृत्तपत्र जनमानसाचा आधार -भास्करगिरी महाराज
 
नेवासा /जलभूमी वृत्तपत्र 

वृत्तपत्र जनतेच्या हितासाठी काम करत असते. अन्यायकारक घटनेचा समाचार घेणारे आणि चांगल्या कामाचे कौतुक करणारे वृत्तपत्र तळागाळातील जनमानसाचा आधार असल्याचे प्रतिपादन देवगड देवस्थांंनचे महंत गुरुवर्य भास्करगीरीजी महाराज यांनी केले. 



नेवासा तालुक्यातील श्री. क्षेत्र देवगड येथे दैनिक जलभूमी अंकाच्या कलर अंकाचे प्रकाशन महंत भास्करगीरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराजांसमवेत जलभूमी संपादक बाळासाहेब जाधव, निवासी संपादक शंकरराव मरकड, जाहिरात व्यवस्थापक दिपक खोसे , वडुले प्रतिनिधी सुनिल रणमले , नेवासा प्रतिनिधी सुधीर चव्हाण व इतर भक्तगण उपस्थित होते. १३ एप्रिल २०२१ रोजी सुरू झालेल्या दैनिक जलभूमी अंकाचे आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहुर्तावर कलर प्रिंट अंकाचे प्रकाशन करण्यात आले. 

जलभूमी अंकाला वाचकांचा प्रतिसाद वाढत आहे. प्रशासनाला दैनिक जलभूमी ने वेगळाच ठसा उमटाविला असल्याने. ग्रामीण भागातील तळागाळातील प्रश्नाला वाचा फोडली जाते. अनेक वृत्ताची प्रशासकीय पातळीवर दखल घेतली गेली. काही कर्मचाऱ्यांंवर कारवाई झालेली आहे. कलर अंकाचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...