गावाला स्मशानभूमीच नाही, अंत्यविधी करायचा कुठे? गावकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

गावाला स्मशानभूमीच नाही, अंत्यविधी करायचा कुठे? गावकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न

जागा उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतीसमोर अंत्यविधी करण्याचा निर्णय मात्र ........
 

श्रीरामपूर / जलभूमी वृत्तसेवा 

--------------------------------

 

श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी ग्रामपंचायतीचे विभाजन करून गुजरवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यात आली. मात्र या ग्रामपंचायतीकडे कुठल्याही सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.असाच एक प्रकार समोर आला आहे.गुजरवाडी येथील कौसाबाई काशिनाथ ठाकर ( वय-९० वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा दफनविधी करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने अंत्यविधी करायचा कोठे? हा यक्ष प्रश्न गावकऱ्यांपुढे उभा ठाकला. 

 


 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुजरवाडी गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात आली. सरपंच, प्रशासकीय ग्रामसेवकाची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली. परंतू नवीन ग्रामपंचायत फक्त नावालाच झाली आहे. या ग्रामपंचायतीकडे स्वमालकीची किंवा गावठाणसाठी जागा शिल्लक नाही. पिण्याचे पाणी नाही. स्मशानभूमी नाही. अशा अनेक समस्यांना गावकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.गुजरवाडी ग्रामपंचायतकडे चक्क गावठाण ( मोकळी जागा ) शिल्लक नसल्याने अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला. गुजरवाडी येथील वृध्द महिला कौसाबाई काशिनाथ ठाकर ( वय-९० वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा दफनविधी करण्यासाठी जागा नसल्याने दफनविधी करायचा कोठे? हा प्रश्न उपलब्ध झाला. 

 

खिर्डी ग्रामस्थांनी दफनविधी करण्यास नकार दिल्यामुळे एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष मोरे यांनी दफनविधी गुजरवाडी ग्रामपंचायत समोर करण्याचा निर्णय घेवून दफनविधी करण्यासाठी चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोर खड्डा खोदण्याचे काम चालू केले. हि बाब तालुका प्रशासनाला कळताच प्रशासनाच्या वतीने श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार, पोलीस मित्र बाबा सय्यद, तलाठी डोके, अखिल भारतीय मानवाधिकार मिशन जिल्हाध्यक्ष विलास गिते, पत्रकार एन. डी. चोरमले, कानिफनाथ पवार, पोलीस पाटील हलनोर यांनी खिर्डी गावचे सरपंच प्रभाकर कांबळे व ग्रामस्थांशी प्रत्यक्ष भेट घेऊन हा विधी खिर्डीमध्ये होऊ द्यावा.अशी चर्चा करण्यात आली.

 

यापुढे गुजरवाडीत स्वतंत्र व्यवस्था करु असे सांगण्यात आले. खिर्डी सरपंच व ग्रामस्थांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात सहकार्याची भूमिका घेत या महिलेच्या अंत्यविधीसाठी संमती दिली. ग्रामस्थांनी अंत्यसंस्काराची पुढील तयारी करण्यात आली. व खिर्डी येथे उशिरापर्यंत अंत्यविधी करण्याचे काम चालू होते. यावेळी सचिन गुजर, चेअरमन गुजर, पोलिस स्टेशनचे पीएसआय बोरसे, पोहेकॉ. पवार, पोलीस नाईक मुंडले, पोलीस मित्र बाबा सय्यद, एन. डी. चोरमले यांच्यासह आदिवासी समाज उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...