डॉक्टरी व्यवसायातून फावल्या वेळेत बोधेगाव येथील डॉ. विक्रांत घनवट यांनी जोपासलाय पक्षी फोटोग्राफिचा छंद
शेवगाव
बोधेगाव येथील व्यवसायाने डॉक्टर असलेले विक्रांत प्रकाश घनवट यांनी मोबाईलने काढलेल्या 'पंचरंगी सुर्य पक्ष्याची घसरगुंडी खेळतानाच्या अदाची (फोटो) दखल अमेरिकेतील 'दि एपोज टाईंम्स' या वृत्तपत्राने घेतली आणि तेंव्हापासून या पक्षांच्या जिवनाचा आणि फोटोग्राफीचा छंद लागला आणि तो जोपासला.
पक्ष्यांच्या फोटोचा संग्रह करून नुकताच तो प्रदर्शनाच्या माध्यमातून घनवट यांनी प्रेक्षकांसमोर ठेवला होता. यात पंचरंगी सुर्यपक्ष्याचे घसरगुंडी खेळतानाचे टिपलेले छायाचित्र प्रदर्शनात कौतुकाचा विषय बनला होता.
डॉक्टर विक्रांत घनवट यांनी मोबाईलने काढलेल्या 'पंचरंगी सुर्य पक्ष्याची घसरगुंडी खेळतानाची अदा
(छायाचित्र सौजन्य - उध्दव देशमुख)
शेवगांव येथे डॉक्टर असोसिएशनने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात डॉ. विक्रांत घनवट यांनी पंचरंगी सुर्यपक्ष्याबरोबर चिंकारा, चष्मेवाला, बाज, कोकिळा, रोहित, कदंब, राजहंस, भोत्या, घुबड, हळदीकुंकू बदक, छोटा अर्ली, करडा धोबी, थापट्या, आदिसह ५० पक्ष्यांच्या आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेल्या वेगवेगळ्या अदाकारीचे दर्शन शेवगावकरांना अनुभवायला मिळाले.
प्रदर्शनाचे उद्घाटन जेष्ठ नेते बापुसाहेब भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...