: तालुका प्रतिनिधी
---------------
पारनेर - तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील रहिवासी व सध्या नगर येथे वास्तव्यास असलेले जिल्हा सहकारी बँकेचे सेवानिवृत्त लेखापरीक्षक दादासाहेब सखाराम गांगड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. निधना समयी यांचे वय ८० वर्षाचे होते. आध्यात्मिक वृत्तीचे असणारे दादासाहेब गांगड यांची ज्ञानेश्वरी ही तोंडपाठ होती. त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरी
स्वहस्ताक्षरात लिहून पण काढली होती. जिल्हा सहकारी बँकेत पारनेर कान्हुर पठार नगर या ठिकाणी शाखाधिकारी म्हणून काम केले होते नंतरच्या काळात जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात बदली झाल्यानंतर लेखा परीक्षक म्हणून चार वर्षे कामकाज पाहिले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा, ४ मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने अध्यात्मिक व सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली जात आहे. नगर येथील प्रसिद्ध शेअर ब्रोकर प्रसाद गांगड यांचे ते वडील तर पत्रकार शरद झावरे यांचे सासरे तर भोयराचे माजी सरपंच दौलतराव गांगड यांचे चुलते होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...