किरण काळे
पैठण / जलभूमी वृत्तसेवा
पैठण शहरात दिवसभर हातगाडीवर कुल्फी विकणाऱ्या परप्रांतीयाचा शेजाऱ्याने हातोड्याने वार करत खुन केल्याची घटना रविवार दि.२३ मे रोजी सकाळी उघडकीस आली.घटनेतील आरोपी फरार झाला होता. पैठण पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवुन आरोपीला ५ तासात गजाआड केले आहे.
आरोपी करिम शहा याने गुन्ह्याची कबुली दिली असुन त्याच्यावर ३०२ कलमान्वये पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैठण शहरातील शासकीय विश्रामगृह रोडवरील फकीरवाडा परिसरात मयत परप्रांतीय कुल्फी विक्रेता मायाशंकर प्रजापती (वय ४५ वर्षे) हा गेल्या अनेक वर्षांपासुन तिथला निवासी असुन त्याचे स्वतःच्या मालकीचे घर देखील आहे.
हातगाडीवर दिवसभर शहरात फिरून कुल्फी विकुन तो आपल्या परिवाराची उपजिवीका भागवतो. मयत मायाशंकर प्रजापती यांंच्या शेजारी राहत असलेल्या करिम शहा (वय ३५ वर्षे ) यांच्यात किरकोळ कारनातुन नेहमी खटके उडत होते. या भांडणाचे रूपांतर रविवारी खुनात झाले. मायाशंकर हा सकाळी कुल्फीची हातगाडी काढत असतांना त्याच्या तोंडावर करिमने हातोड्याने वार करत त्याला गंभिर जखमी केले होते. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता.
जखमी मायाशंकर प्रजापतीला आजुबाजुच्या नागरिकांनी पैठण शासकीय घाटी रूग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिक गंभीर असल्यामुळे डाँक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला औरंगाबाद घाटीत पाठविण्याचा सल्ला दिला. माञ त्याचा रक्तश्राव अधिक झाल्यामुळे प्रजापती यांची वाटेतच प्राणज्योत मावळली. पैठण पोलीसांनी अवघ्या पाच तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. हि कामगीरी पोलीस उपविभागिय अधिकारी गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, स.पो.नि.गजानन जाधव उपनिरीक्षक साहेबराव गिरासे, रामकृष्ण सागडे यांनी केली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे हे करित आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...