अहमदनगर / जलभूमी वृत्तसेवा
-----------------------------
ग्रामपंचायतीचे कोरोणा सेंटर हे दर्जेदार व आदर्श असावीत. त्यात काय सोयी सुविधा देण्यात याव्यात. आ. निलेश जी लंके यांचा फॉर्मुला शक्य तितका ग्रामपंचायतींच्या सेंटरमध्ये मार्गदर्शक ठरावा. याकरिता सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता भाऊ काकडे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते पाटील, प्रदेश महासचिव विकास जाधव, प्रदेश महिला उपाध्यक्ष अश्विनी थोरात, अहमदनगर जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे हे भेट देऊन माहिती घेणार आहेत. ही माहिती थेट सरपंच परिषदेच्या फेसबुक लाईव्ह वरून आ. निलेशजी लंके यांच्या कडून राज्यातील सरपंचांना मिळणार आहे .असे सरपंच परिषदेचे प्रदेश प्रसिद्धीप्रमुख बापू जगदाळे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...