' लिव्ह इन'मधील प्रेयसीचीही दगडाने ठेचून हत्या, आरोपी ज्ञानेश्वर गायकवाडचा धक्कादायक खुलासा
शिरूर येथील सराफा व्यापारी विशाल कुलथे ( वय- २४ ) यांंच्या खून प्रकरणातील मास्टरमाइंड ज्ञानेश्वर उर्फ भैय्या शिवाजी गायकवाड ( वय - २२ , रा . भातकुडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर ) याला मंगळवारी ( दि .१ ) नाशिक येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. चौकशीत त्याचे इतर कारनामे उघड होत आहेत. दोन महिन्यांपूर्वी ' लिव्ह इन' मध्ये राहणा-या प्रियसीच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घून हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा केला.
दरम्यान राहुरी ( जि.अहमदनगर ) पोलीस ठाण्यात अनोळखी महिलेच्या खुनाची नोंद झाली होती , सराफा व्यापारी खुनापाठोपाठ या महिलेच्या खुनाचाही उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. विशाल कुलथे हे सराफा व्यापारी दि.२० मे रोजी अचानक बेपत्ता झाले होते. शिरुर पोलीस ठाण्यात नोंंद झाल्यानंतर तपासाचे धागेदोरे ज्ञानेश्वर गायकवाड पर्यंत असल्याचे निष्पन्न झाले होते , दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्ञानेश्वरने विशाल यांचा विश्वास संपादन केला.
दि. २० रोजी दागिन्यांचे पैसे देण्याचा बनाव करत सलूूनच्या दुकानात नेऊन कात्रीने गळ्यावर वार करुन खून करत दागिन्यांंसह पोबारा केला . दोन मित्रांच्या मदतीने विशाल यांचा मृतदेत दुचाकीवरुन भातकुडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर येथे नेऊन शेतात पुरुन टाकला होता. या प्रकरणात ज्ञानेश्वर गायकवाडचा पिता शिवाजी गायकवाड तसेच धीरज मांंडकर ( रा.आनंदनगर , पाथर्डी ) व केतन लोमटे ( रा.भातकुडगाव ) यांना पोलिसांनी अटक केलेली आहे.
फरार ज्ञानेश्वर गायकवाडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भारत राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी पहाटे मोठ्या शिताफीने नाशिकमध्ये मुसक्या आवळल्या . त्याला घेऊन पथक बीडमध्ये पोहोचले. ज्ञानेश्वरला शिरुर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली . दरम्यान गुन्हे शाखेने त्याची कसून चौकशी केली . यावेळी त्याने प्रेयसीच्या खुनाची कबुली दिली. या महिलेच्या खुनाची माहिती राहुरी जि.अहमदनगर येथील पोलिसांना कळविण्यात आले आहे.
सर्व बाजूंनी तपास करणाई - लगारे
सराफा व्यापारी खून प्रकरणातील मुख्य आरोपी पकडण्यासाठी आठ दिवसापासून शर्थीचे प्रयन सुरु होते . नाशिकमधून त्यास अटक केली आहे. सराफा व्यापारी संघटना व नागरिकांनी सयंम दाखविला व पोलिसांच्याही प्रयत्नाना यश आले. केवळ दागिने लुटीसाठी त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे . मात्र , सर्व बाजूनी तपास करण्यात येणार आहे.
विजय लगारे,
उपअधीक्षक आष्टी
विशाल कुलथे खून प्रकरणातील मुख्य आरोपीने राहुरी ठाणे हद्दीतील खुनाची कबुली दिली आहे. तो अतिशय धूर्त व चाणाक्ष आहे . प्रेयसीला संपविल्यानंतर तिची ओळख न पटल्याने त्या गुन्ह्यातून तो अलगद निसटला होता. धाडस वाढल्याने अवघ्या दोन महिन्यात त्याने दुसरा गुन्हा केला. योग्य ते साक्षी- पुरावे गोळा करुन त्यास शिक्षेपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न आहेत.
भारत राऊत ,
पोलीस निरीक्षक ,
स्थानिक गुन्हे, शाखा - बीड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...