पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी अध्यक्षा घुलेंची महत्वाची चर्चा
अहमदनगर/ जलभूमी वृत्तसेवा
कोरोना महामारीने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने वेळीच उपाययोजनेवर भर दिल्यामुळे दुसरी लाटही आटोक्यात आली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेला दोन हात करण्याची तयारी केली आहे. मात्र ग्रामीण भागात लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ.राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडे केली आहे.
अहमदनगर जिल्हाचे पालकमंत्री तथा , ग्रामविकास व कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य ना. हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले असताना जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाय योजना व लसीकरण बाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जि.प.अध्यक्षा घुले यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या शी विविध विषयावर चर्चा केली.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीबाबत सविस्तर माहिती देत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लसीकरण वाढवण्यात यावी. अशी मागणी केली.
जिल्हा परिषदेमार्फत चाललेल्या कामकाजाची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हा परिषदेला जास्तीत जास्त निधी शासनाकडून मिळवून द्यावा. यासह अनेक जिल्ह्यातील प्रश्न पालकमंत्र्यांच्या कानावर घालण्यात आले. अशी माहिती यावेळी देण्यात आली. या आढावा बैठकीला नगर शहरचे आ.संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले,जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...