दैनिक जलभूमी व भातकुडगांव परिसराच्यावतीने नागरी सत्कार
शिवम जाधव
भातकुडगांव फाटा / जलभूमी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्याचे नामदार हसन मुश्रीफ ( पालकमंत्री ) यांच्याकडे शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी पाठपुरावा करून माझ्या नावाची सदस्यपदासाठी शिफारस करून जेष्ठ कलावंतासाठी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली.असे प्रतिपादन जेष्ठ कलावंत मानधन समितीचे नवनिर्वाचित सदस्य शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांची ज्येष्ठ कलावंत मानधन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केल्याचे लेखी पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले.
त्या निवडीबद्दल दैनिक जलभूमी परिवार व भातकुडगाव, भायगाव, बक्तरपुर, हिंगणगाव परिसराच्यावतीने शेवगाव- नेवासा राज्यमार्गावरील भातकुडगाव फाटा येथे नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी शिवशाहीर कल्याण काळे बोलत होते.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी बक्तरपूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते काळुराम जाधव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीपराव बामदळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मुकुंद जमधडे, भायगावचे माजी सरपंच राजेंद्र आढाव, भारुडसम्राट हमीद सय्यद, दैनिक जलभूमी संपादक बाळासाहेब जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवशाहीर कल्याण काळे पुढे म्हणाले की, यापुढील काळामध्ये भारूडकार, पोतराज, गोंधळी, वाघ्या- मुरळी, डोमारी खेळ करणारी मंडळी किंंवा लोकनाट्यातील लोककलावंतांना प्रामुख्याने मदत मिळाली पाहिजे.अशी भूूमिका आपली आहे.
पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कलावंत निवडण्याची जबाबदारी आपल्यावर दिली आहे.यानिमित्ताने उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याची आपल्याला संधी मिळाली. या संधीचे सोन करु. ५० वर्षावरील जेष्ठ कलावंतानी व दिव्यांग कलावंतानी विहीत नमुन्यात आपले प्रस्ताव सादर करावीत.असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी चे युवक कार्यकर्ते तथा डॉ. क्षितीज घुले पाटील युवा मंचाचे सचिन फटांगरे, अमोल वडणे,अनिल भेंडेकर, विजय वडणे,आप्पासाहेब मरकड, हरिभाऊ वाघमोडे, राजेंद्र फाटके, पांडूरंग गायकवाड यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...