माजी आ. चंद्रशेखर घुले यांची कृषी मंत्र्याकडे मागणी
मुंबई । प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव शे, भातकुडगाव,चापडगाव या मंडळातील गावांचा पिक विम्यामध्ये समावेश करण्यात यावा.अशी मागणी माजी आ. चंद्रशेखर घुले यांची कृषी मंत्र्याकडे केली आहे.
तालुक्यातील ढोरजळगाव शे, भातकुडगाव,चापडगाव या मंडळातील गावाचा समावेश न झाल्याने आज महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे यांची मुंबई याठिकाणी शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे मा. आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी भेट घेऊन सर्व मंडळातील गावाचा समावेश करण्यात यावा यासाठीचे निवेदन दिले.
ना. मुढे यांची ग्वाही
नामदार धनंजय मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. व चंद्रशेखर घुले यांना ढोरजळगाव शे, भातकुडगाव,चापडगाव या मंडळातील गावाचा समावेश करण्याची ग्वाही दिली.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...