शिरसगांव येथे श्रीराम मंदिरात महाआरती व मिरवणूक संपन्न - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

शिरसगांव येथे श्रीराम मंदिरात महाआरती व मिरवणूक संपन्न

   : प्रतिनिधी

------------

श्रीरामपूर - तालुक्यातील शिरसगांव येथे अयोध्यात होणाऱ्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतभर प्रभू श्रीराममय वातावरण दि २१ व २२ जानेवारी रोजी होत असल्याने शिरसगांव येथेही रविवारी सायंकाळी ५ ते ७ वाजता भव्य कलश मिरवणूक फटाक्यांची आतषबाजी करीत सवाद्य भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली त्यात शिरसगांवचे सर्व पुरुष महिला, बालके मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.महिलांनी डोक्यावर कलश घेतले होते.विठल मंदिरात दिपोत्सव साजरा झाला. त्याचप्रमाणे सोमवार दि.२२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्रीराम प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली. दुपारी १२ वाजता महाआरती सरपंच राणी वाघमारे,उपसरपंच संजय यादव, निलेश यादव,गणेश मुद्गुले , गणेश वाघ,या दांपंत्याचे हस्ते करण्यात आली.त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला..या आनंदमय सोहळ्यात सर्व ग्रामस्थ,सहभागी झाले होते.हा सोहळा यशस्वीतेसाठी अध्यक्ष श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार योजना, गणेशराव मुदगुले,सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच संजय यादव, अशोकराव पवार, बापूसाहेब काळे,सुरेश मूदगुले आदी मान्यवर व सर्व ग्रा .प. सदस्य, शिरसगाव ग्रामस्थ,भजनी मंडळ, यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...