प.स.सदस्या मिराताई लांडे यांचे दुख:द निधन - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, १७ एप्रिल, २०२१

प.स.सदस्या मिराताई लांडे यांचे दुख:द निधन

दिलीपराव लांडे यांच्या सौभाग्यवतीचे दुख:द निधन
 
शेवगांव / जलभूमी वृत्तसेवा 
 
शेवगाव पंचायत समितीच्या पंचायत समितीच्या सदस्या मिराताई लांडे वय - ६२ यांचे नुकतेच दुख:द निधन झाले. त्या पाच दिवसापासून आजारी होत्या.
 

 
त्यांच्यावर नगर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार चालू होते. अचानक निधन झाल्याची वार्ता तालुक्यात वा-यासारखी पसरली. कार्यकर्त्यांनी शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथील त्यांच्या घराकडे धाव घेवून हळहळ व्यक्त केली जात होती. त्यांच्या मागे पती, मुलगा, सुन, तीन मुली, जावई असा परिवार आहे. स्व. मारूतराव घुले पाटील यांचे अत्यंत विश्वासू राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीपराव लांडे पाटील यांच्या सौभाग्यवती होत्या. जोहरापूर ग्रामपंचायत उपसरपंच रोहन लांडे यांच्या आई होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...