वाचकांची संख्या लाखाकडे आगेकूच, वाचकांना धन्यवाद
शेवगांव । जलभूमी वृत्तसेवा
जल भूमी नावाने प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर वाचकांच्या आग्रहखातर दि. ६ एप्रिल पासून पोर्टल सुरु केले. दहा दिवसांत वाचकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी दि. १६ रोजी साय. ५ वा. ७१ हजार वाचकांची नोंद झाली.
दैनिक डिजिटल अंकाचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला. या अंकासही भरभरुन प्रतिसाद मिळाला. सकाळी लवकर डिजिटल अंक सोशल मिडीयावर आला नाहीतर लगेच वाचकांचे फोन, मेसेज यायला सुरुवात होते. व्हॉट्सअॅप , फेसबुक वगळता वेवसाईटवर तीन दिवसांत २ हजार वाचकांची नोंद झाली.
पोर्टलवर शुक्रवार दि.१६ अखेर ६० बातम्या प्रकाशित करण्यात आल्या. यामध्ये अनुक्रमे १) लग्न समारंभातील सत्काराला फाटा देत शिवस्मारकाला देणगी, २) लग्नसमारंभासाठी नविन नियम, ३) पोलीसांनी बोगस डाॅक्टरला ठोकल्या बेड्या, पात्रता नसतानाही होते लुटमार, ४) पहिलवानाची गळफास घेवून आत्महत्या, ५) वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस या पाच बातम्या वाचकांनी लोकप्रिय ठरविल्या आहेत.
त्यामुळे जलभूमी चे मार्गदर्शक शौखतभाई शेख, बाळासाहेब जाधव, संपादक शिवम जाधव, निवासी संपादक शंकर मरकड, दिपक खोसे, रामनाथ रुईकर, सुनील रणमले, ईश्वर वाघमारे, सलीम शेख, शिवाजी खरड, सोपान जाधव, जलभूमी परिवारांंतर्फे वाचक, प्रतिनिधींना धन्यवाद देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...