अनाथ मुलांच्या रोजी रोटीसाठी सरसावले युवक - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

अनाथ मुलांच्या रोजी रोटीसाठी सरसावले युवक

शेवगांव हेल्प पिपल्स ग्रुपच्या वतीने किराणा साहीत्य सुपूर्द

 

शेवगाव / जलभूमी वृत्तसेवा 

 

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात माता पित्याचे छत्र हरवलेल्या अनाथ व गरीब मुलांचा सांभाळ करणा-या सामाजिक संस्थेला अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशा अडचणीत मुलांचा सांभाळ करणा-या मातोरी येथील सेवातिर्थ संस्थेच्या मदतीला शेवगाव येथील रहिवाशी व कामानिमीत्त शहरात स्थलांतरीत झालेल्या मित्र परीवाराने तीन महिने पुरेल एवढे किराणा सामान देवून मदतीचा हात दिला आहे. 

 


 

मातोरी तालुका शिरुर जि.बीड येथील सेवातीर्थ ही सामाजिक संस्था अनाथ, निराधार, भटक्या सामाजातील मुलांच्या राहण्याची व शिक्षणाची सोय करते. सोनाली व सचिन गायकवाड हे दामप्त्य गेल्या दहा वर्षापासून मातोरी सारख्या ग्रामिण आणि दुर्गम भागात स्वत:च्या जागेत ही संस्था चालवतात. तेथे राज्यभरातील ३३ विदयार्थी निवासी राहतात. सध्या कोरोना संसर्गाच्या काळात शाळा बंद असल्याने तेथे १४ विदयार्थी राहतात मात्र किराणा व अन्नधान्य अभावी त्यांचे खाण्यापिण्याचे वांधे निर्माण झाले आहेत. शिवाय सर्वत्र लॉकडाऊन असल्याने दानशुर व्यक्तीकडून होणारा मदतीचा ओघ मंदावला आहे. अशा कठीण प्रसंगात स्वखर्चाने या मुलांची भुक भागवताना गायकवाड दामप्त्यांवर आर्थिक डोंगर कोसळला आहे. येथील विदयार्थ्यांना मदतीसाठी सामाजिक संस्था व दानशुर व्यक्तींनी पुढे यावे यासाठीची पोस्ट सोशल मिडीयावर गायकवाड यांनी टाकली. 

 

त्यानंतर मुळचे शेवगाव येथील पण नोकरी व्यवसायानिमीत्त पुण्यासह इतर शहरात स्थलांतरीत झालेल्या अविनाश ढोले यांच्या हेल्प पिपल्स ग्रुपने या संस्थेस मदतीचे आवाहन केले. त्यानुसार ललीत चौधरी, विनायक त्रिगणे, कलीम बेग, विवेक पाटील, गणेश भिंगळे, विशाल गवळी, ज्ञानेश्वर आढाव, शाम गावडे, निलेश कोकाटे, निलेश ढोले, नितीन सौदंते, महेंद्र हिंगासपुरे, अमोल गुंजाळ, प्रमोद वाळुंजे, नितेश कदम, सुधीर दहीते, सुहास देवुतकर, प्रविण वाघ, सुहास गुंडेवार, श्रध्दा मगर, सुशील कतरे, चंद्रशेखर अतुलहिरण, प्रविण पामेजुला, किशोर उदावंत, नितीन लोखंडे, पत्रकार राजू घुगरे, सचिन सातपुते , अलीम शेख, संदीप देहाडराय, विजय धनवडे या सर्व मित्र परीवाराने ४० हजाराहून अधिक रुपयांचा निधी गोळा केला. त्यातून गहू, तांदूळ, तेल, तुप, शेंगदाने, रवा, पोहे, डाळी असे अत्यावश्यक किराणा साहीत्य खरेदी करुन ते गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. 

 

त्याबरोबरच मुलांना मिठाई देण्यात आली. या मदतीमुळे येथील विदयार्थ्यांचा तीन महिन्याचा रोजी रोटीचा प्रश्न मार्गी लागला असून कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊन असतांना गोरगरीब अनाथ, भटक्या समाजातील मुलांसाठी मदतीच्या रुपाने देवदूत धावून आल्याची भावना सेवातीर्थचे संचालक सचिन गायकवाड यांनी व्यक्त केली. 

 


दानशुर व्यक्तींनी पुढे यावे - ढोले
 
कोरोना संसर्गाच्या काळात जगण्याचा संघर्ष अधिक तीव्र झाला असून आई वडीलांचे छत्र हरवलेल्या व भटक्या गरीब मुलांसाठी दोन घास जेवणाची सोय करणे हे आपले कर्तव्य आहे. असे समजून मित्र परीवाराने मदत केली. आपल्या परीसरातील अशा व्यक्तींसाठी यथाशक्ती मदत करण्यासाठी समाजातील दानशुर व्यक्तींनी पुढे यावे.

- अविनाश ढोले 
हेल्प पिपल्स ग्रुप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...