राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवभोजन थाळी उपक्रमाचे कौतुक - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवभोजन थाळी उपक्रमाचे कौतुक

सभापती डॉ. क्षितिज घुले यांचा छावा क्रांतिवीर सेनेतर्फे सन्मान
 
शेवगाव / जलभूमी वृत्तसेवा 
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गरीब व गरजूंसाठी पार्सल स्वरूपात राबवण्यात येणाऱ्या मोफत शिव भोजन थाळी उपक्रमाचा प्रारंभ पंचायत समिती सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील यांच्या उपस्थितीत येथील बस स्थानकाजवळील क्रांती चौकात करण्यात आला.
 


या उपक्रमाचे छावा क्रांतिवीर सेनेतर्फे कौतुक करुन संघटनेतर्फे सन्मान करण्यात आला. अशी माहिती तालुकाध्यक्ष स्वप्निल राजेभोसले यांनी दैनिक जलभूमी प्रतिनिधी शी बोलताना दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक कार्यकर्ते कमलेश लांडगे ,कृष्णा सातपुते, रोहन साबळे, संकेत वांडेकर ,समीर शेख, वहाब शेख, संतोष अभिजीत आहेर, संतोष जाधव, आदिल शेख, आकाश चोपडे आदी उपस्थित होते कोविड- 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, विविध संस्था अनेक उपाय योजना राबवीत आहेत. 
 

 
तरीही तो आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाने अखेर लॉक डाऊन व संचारबंदी लागु केली.पंधरा दिवस कडक जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे .त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक बेकारांच्या जेवणाचे हाल होत असल्याचे पाहून राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राज्यात अशा गरजूंसाठी जनता कर्फ्यू च्या काळात मोफत पार्सल जेवण थाळी सुविधा राबविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी जातीने लक्ष घालून शेवगावात हा उपक्रम सुरू केला त्याबद्दल छावा क्रांतिवीर सेना तालुका कार्यकारिणी च्या वतीने कौतुक करून धन्यवाद दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...