कोल्हार घोटी रोडवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत गांधीगिरी
सतीश पाचपुते
अकोले / जलभूमी वृत्तसेव
कोल्हार घोटी रोडवर गेली कित्येक दिवसांपासून पडलेले मोठे खड्डे व सातत्याने होत असलेले अपघात यामुळे परिसरातील लोक अस्वस्थ असून ठेकेदारही मुजोरपणे वागत आहे, म्हणून अकोलेचे माजी सभापती व तरुण आदिवासी नेते मारुती मेंगाळ हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून आपल्या निवडक कार्यकर्त्यांसोबत अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
कोल्हार घोटी रोडच्या कामावर क्वालिटी कंट्रोल ची समिती नेमा, अपघातात बळी पडलेल्या नागरीकांना भरपाई द्या, अकोले तालुक्यात पुरेसा रेडमेसिव्हर साठा उपलब्ध करून द्या, किमान १ हजार ऑक्सीजन बेड तातडीने उपलब्ध करून द्या. या सह विविध प्रकारच्या मागण्यासाठी सभापती मारुती मेंगाळ हे इंदोरी फाट्यावर आमरण उपोषण करत आहेत. या आंदोलनाची सुरुवात त्यांनी कोल्हार घोटी रोडवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत गांधीगिरी मार्गाने या आंदोलनाची सुरुवात केली.
या प्रसंगी काँग्रेसचे नेते मिनानाथ पांडे, बाळासाहेब नाईकवाडी, सुरेश पथवे, जगन देशमुख, बाळासाहेब शिंदे, डॉ. रामहरी चौधरी, मनसेचे अध्यक्ष दत्ता नवले, प्रदीप हासे, जावेद जहागीरदार, बाळू मधे, हेमंत दराडे, कल्पेश काळे, माऊली बांबळे, मधुकर पथवे, विलास उघडे, दिपक कासार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...