गर्दी हटेना, हॉटस्पॉट ठरण्याची चिन्हे - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

गर्दी हटेना, हॉटस्पॉट ठरण्याची चिन्हे

चांद्यात अर्धशतक रुग्णसंख्या असल्याचा अंदाज
 
 
अरुण सोनकर 
चांदा / जलभूमी वृत्तसेवा 
 
नेवासा तालुक्यात कोरोनाचे आकडे वाढत असताना तालुक्यातील चांदा गावही आता हॉटस्पॉट ठरण्याची चिन्हे दिसत असून विनाकारण रोजच होणारी बिनकामाची गर्दी कमी न झाल्यास भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या गर्दी हटविण्यासाठी प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे प्रयत्न होताना दिसत नाही. 
 

 
गेली चार पाच दिवसापासून चांदयातील रुग्णसंख्या वाढू लागली असल्याने मोठी चिंता वाढली आहे . सध्या गावात अर्धशतका दरम्यान रुग्णसंख्या असल्याचा अंदाज वैद्यकिय तज्ञामार्फत वर्तविला जात आहे. ही आकडेवाढ खरी असली तर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मत व्यक्त होत असून गावातील खाजगी डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व अधिकारी कर्मचारी आपआपल्या परीने ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण करण्याचे प्रामाणिक काम करत आहेत. लोकांनीच स्वतः काळजी घेणे गरजेचे असल्याने गावात विनाकारण होणाऱ्या गर्दीला लगाम लागणे आवश्यक आहे. 
 
तालुक्यात जागृत म्हणून ओळख असलेल्या चांदा गावाने आता आरोग्याच्या बाबतीतही जागरूकता दाखविण्याची गरज आहे. विनामास्क फिरणाऱ्यावर प्रशासन कारवाई करत आहे. आपल्या कुंटुबासाठी आपणच विमामास्क फिरू नये हे लक्षात घेणे गरजेचे आहे. गावची लोकसंख्या मोठी असल्याने काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे .आतापर्यंत गावात रुग्णसंख्या नियंत्रित होती. आता दुसऱ्या लाटेने गावात शिरकाव केल्याने आता आपल्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी बनली आहे. शासनाने ठरवुन दिलेल्या निकषात बसणाऱ्या नागरिकांनी लसीकरण करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. रजनिकांत पुंड यांनी केले असून विनाकारण फिरू नका. 
 
...अन्यथा कडक कारवाई करु - कर्पे 
सोनई पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे हे परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत स्वतः गावात फिरून नियम भंग करणारांवर कडक दंडात्मक कारवाई करत आहेत. नियम भंग करणारांवर कारवाईचा दणका आणखी कडक करणार असल्याचे सुतोवाच कर्पे यांनी केले आहे. नागरीकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये. विना मास्क फिरू नये गर्दी टाळावी. असे आवाहन त्यांनी केले आहे .
 
हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझचा वापर करा. लक्षणे दिसल्यास त्वरीत तपासणी करून घ्या. लक्षणे असंलेल्या व्यक्तीने इतरांच्या संपर्कात येणार नाहीत. याची स्वतःहून काळजी घ्या। असे आवाहन गावातील माजी सरपंच डॉ . विकास दहातोंडे, डॉ . सुधाकर निकाळजे , डॉ. धाडगे , डॉ. जाधव , डॉ .लेंभे आदि डॉक्टरांनी केले आहे. 
 

नियमाप्रमाणे दुकाने चालु ठेवा - जावळे 
अत्यावश्यक सेवेसह ज्या दुकानांना शासनाने परवानगी दिली आहे. दुकानदारांनी शासनाने ठरवुन दिलेल्या वेळेप्रमाणे तसेच त्यांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे दुकाने चालु आणि बंद करावीत. दुकानात आलेल्या ग्राहकांच्या तोंडाला मास्क असल्याची खात्री करूनच त्यांना वस्तू दयावी. वेळ संपल्यानंतर प्रत्येकाने आपले दुकान बंद करून प्रशासनाला सहकार्य करावे. माजी सभापती कारभारी जावळे
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...