पहिलवानाची गळफास घेवून आत्महत्या - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

पहिलवानाची गळफास घेवून आत्महत्या

सालके या तरुणाने आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने फाशी

 

अहमनगर / जलभूमी वृत्ततसेवा. 14 एप्रिल 

 

पारनेर तालुक्यातील जवळे येथे मनोज सालके या तरुणाने आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. 

 

 

 

 

मिळालेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास जवळा-शिरुर रस्त्यालगत खडामळ्यात नेहमीच्या दिनचर्येप्रमाणे घास आणण्यासाठी मनोज हा गेला होता. शेतातच असलेल्या आंब्याच्या झाडाला घास बांधण्याच्या दोरीने गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपविली. 

 

आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. मनोज उर्फ गोकुळ सालके याची गावामध्ये पहिलवान म्हणून ओळख होती. मनोज याने अनेक यात्रेमध्ये कुस्त्यांचे आखाडे गाजवले होते. मनोज याच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...