गरजुंना अन्नदान व कोविड पेशंटसाठी मदत - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

गरजुंना अन्नदान व कोविड पेशंटसाठी मदत

सामाजिक कार्यकर्ते अशोक कुटे यांचा उपक्रम

अहमदनगर / जलभूमी वृत्तसेवा

अहमदनगर येथील चितळे रोडवरील दुर्लक्षित घटकातील गोरगरीब गरजू लोकांना, अनाथ मुलांना मदत व ज्यांना एक वेळेचे सुध्दा जेवण मिळत नाही. दूर्लक्षीत लोकांना, गरजूंना अन्नदान करण्याची परंपरा केडगांवचे सामाजिक कार्यकर्ते, मराठा सोयरिक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे यांनी राखली आहे.



केडगाव येथील शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते अशोक कुटे यांनी दरवर्षीप्रमाणे वाढदिवसानिमित्त गरजूंना अन्नदान केले. 
( छाया - जलभूमी सेवा )
 

सामाजिकक कार्यकर्ते अशोक कुटे दरवर्षी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस सामाजीक जाणिव ठेवुन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात.यावेळी स्वतःचा वाढदिवस गरजूंना अन्नदान व कोविडांना मदत करून साजरा केला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. सविस्तर वृत्त उद्याच्या दैनिक जलभूमी अंकात वाचा.

अशोकराव कुटे यांच्यात सामाजिक दृष्टिकोन कोणातून स्वतः च्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शिवभोजन थाळी केंद्रास रोख मदत दिली. बूथ हॉस्पिटलला भेट देवून तेथे बेड देण्याचा त्यांचा मानस आहे. ही मानवतेची भावना अभिमानस्पद आहे . अशा समाजोपयोगी व्यक्तिस उदंड आयुष्य मिळो. अशा शुभेच्छा डॉ. संजय कळमकर यांनी दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...