उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांनी घेतला शेवगांव तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, ७ एप्रिल, २०२१

उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांनी घेतला शेवगांव तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

दहिगांव - ने, भातकुडगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राना भेटी, आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या सुचना

 

बक्तरपूर


शेवगांव - पाथर्डी उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांनी शेवगांव तालुक्यातील दहिगांव- ने व भातकुडगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राना अचानक भेटी देवून कोरोना संदर्भात आढावा घेवून आरोग्य कर्मचाऱ्यांना सुचना देण्यात आल्या.

 

corona aadhava baithak

शेवगांव तालुक्यातील दहिगांव- ने हे जिल्हा परिषद अध्यक्षा ना. राजश्रीताई घुले यांचे गांव असून त्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचा चेहरा मोहरा बदला आहे. 


सध्या शासनाच्या वतीने ६५ वर्षावरील व्यक्तिना कोरोना लसीकरण चालू आहे. कोविड लसीकरण, पाँझीटिव्ह रुग्णांची माहिती यावेळी प्रांताधिकारी केकाण यांनी घेतली. यापुढे कोरोना पाँझीटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाईन न करता कोविड सेंटरला पाठविण्यात यावे.कशा सुचना लसीकरणा चर्चानंतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्याबरोबर संवाद साधताना केल्या.

 

कार्यक्षेत्रातील कोव्हीड साथी बाबद चर्चा करून मार्गदर्शन केले.व दहिगांव - ने प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत आतापर्यंत ११९० व्यक्तीना लशीकरण करण्यात आले आहे. आज १३० व्यक्तीना लसीकरण केले. लस संपली असल्याने जिल्हाशी संपर्क साधून लवकरच लस उपलब्ध होईल. लस उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण सुरु करु अशी माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी जल भूमीशी बोलताना दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...