चांदा -कौठा रस्तावरील मुळा उजव्या कालव्याच्या पुलावर रस्ता खचला - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, ७ एप्रिल, २०२१

चांदा -कौठा रस्तावरील मुळा उजव्या कालव्याच्या पुलावर रस्ता खचला

खचलेला रस्ता तातडीने दुरुस्त न केल्यास मोठा अनर्थ होण्याची भीती

 

चांदा

नेवासा तालुक्यातील चांदा - कौठा - कुकाणा रस्ता चांदयापासून कौठापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र चांदयापासून दोन किमी अंतरावरील मुळा उज०या कालव्याच्या नेमके पुलावरच हा रस्ता खचल्याने धोकादायक परीस्थिती निर्माण झाली असून हा खचलेला रस्ता तातडीने दुरुस्त न केल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे

 

rasta durustichi magni

चांदा गावापासून कौठा -कुकाणा हा मोठ्या रहदारीचा रस्ता आहे. ऊस वाहतुकीसह अन्यमालाची वाहतुक तसेच प्रवाशी वाहतुक रात्रंदिवस मोठया प्रमाणावर चालु असते . मात्र मुळा उजव्या कालव्याच्या पुलावरच या रस्त्याला खचल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत . नवीन वाहनचालकाला याचा अंदाज लागत नसल्याने अनेकदा या ठिकाणी अपघात होतात . गाडीचेही अतोनात नुकसान होत आहे. ऊस वाहतुकीसह अन्यमालवाहतुक गाडी चालकाची येथून जाताना मोठी कसरत होत आहे.


लहान लहान चारचाकी गाड्यांना तर या खड्डयातून गाडी कशी बाहेर काढायची याचीच कसरत करावी लागत आहे . यात भर म्हणजे सध्या कालवा दुथडी भरून वाहत असल्याने हा रस्ता अतिशय धोकादायक बनला आहे .सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी चांदा -कौठा परीसरातीत ग्रामस्थांनी केली आहे.


या रस्त्याबद्दल अनेक ग्रामस्थानी मागणी केल्यामुळे चांदा जिल्हा परिषद सदस्य अनिलराव अडसुरे यांनी स्वतः जाऊन पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी ताबडतोब संपर्क करून संबधीत रस्ता दुरुस्ती करण्यास सांगितले. त्यानुसार येत्या दोन तीन दिवसात सदर दुरुस्ती काम पुर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे श्री अडसुरे यांनी ग्रामस्थांना सांगितले.
अरूण सोनकर
चांदा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...