दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास दातीर यांच्या मारेकऱ्याना कठोर शासन व्हावे - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, ७ एप्रिल, २०२१

दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास दातीर यांच्या मारेकऱ्याना कठोर शासन व्हावे

स्वाभिमानी संपादक सेवा संघाकडून या दुर्देवी घटनेचा जाहीर निषेध


श्रीरामपूर


राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार रोहिदास राधुजी दातीर यांची भरदिवसा मल्हारवाडी रस्त्यावरुन अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना काल राहुरी शहरात घडली, ही फारच गंभीर बाब असून भरदिवसा जर पत्रकारांच्या हत्या घडत असतील तर लोकशाही उरलीच कुठे ?,अशी म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे,


doshina-kathor-shasan-karave

जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी तथा पोलिसांचा कमी पडलेला धाक यामुळेच गुन्हेगार निर्भयपणे भरदिवसा पत्रकारांची हत्या करत आहेत, या दुर्दैवी घटनेचा जितका निषेध केला जावा तीतका कमीच आहे, मात्र पोलिस प्रशासनाने सदरील घटनेतील आरोपींना शोधून काढत तात्काळ कठोर शासन करावे, अशी स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे.


पत्रकारांच्या भरदिवसा हत्या करण्याइतपत गुन्हेगारांची मजल गेली असून हे लोकशाहीस मोठे घातक आहे. वेळेतच अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे अन्यथा राज्यभर पत्रकारांना पत्रकारीता करणे मोठे मुश्किल होणार आहे. याकरीता पत्रकारांवरील अशा भ्याड हल्ल्यां विरुद्ध संपुर्ण राज्यभरातील पत्रकारांनी एकत्र येऊन एक मोठे जनांदोलन उभारणे गरजेचे आहे.


याकरीता या दुर्देवी घटनेचा तिव्र शब्दात निषेध नोंदवत, संबंधित प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत राज्यभरातील प्रत्येक शहर/ तालुका/ जिल्ह्यात पत्रकार बंधू-भगीनींच्यावतीने पोलिस प्रशासनास निवेदने देण्यात यावीत, जेणे करुन कुठल्याही पत्रकारांवर अशी दुर्देवी वेळ येऊ नये, तथा राज्यभरातील पत्रकारांना पोलिसांकडून पुरेसे संरक्षण मिळावे, त्यांच्या तक्रारींची पोलिसांकडून तात्काळ दखल घेण्यात यावी, संबंधित घटने प्रकरणी लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन त्यांना कठोरात कठोर शासन करावे, अन्यथा राज्यभरातील पत्रकार आणि संपादकांच्यावतीने  मोठे जनांदोलन छेडले जाईल, याची वेळीच दक्षता घेतली जावी. अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष शौकतभाई शेख यांच्याकडून प्रसिद्धीसाठी देण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...