शेवगाव
पंधराव्या वित्त आयोगाची भरपूर कामे हातगाव ग्रामपंचायत यांना मंजूर झालेले आहेत. ही सर्व कामे तीन लाखाच्या आतील असल्याने या सर्व कामाच्या ई निविदा काढाव्या, या मागणीसाठी शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील काही ग्रामस्थांनी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शेवगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत कार्यालय हातगाव यांना लेखी निवेदन दिले आहे.
सदरील दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव सध्या १५ वित्त आयोगाचे भरपूर कामे हातगाव ग्रामपंचायत यांना मंजूर झालेले आहेत. हे सर्व कामे तीन लाखांच्या आतील आहेत. हे कामे सरपंच सरपंचाच्या मर्जीतील ठेकेदार यांना देतात. ह्या कामाची जाहिरात अशा पेपरला दिली जाते की जे पेपर हातगाव ,बोधेगाव येथे येत नाहीत. ग्रामस्थांना ग्रामसभेत कोणते कामे आली त्याबद्दल माहिती दिली जात नाही.
मागच्या पाच वर्षात हि भरपूर कामे ड्रॉ पद्धतीने देण्यात आले. बोधेगाव येथे येणाऱ्या पेपरला बातमी न देता इकडे येत नाहीत अशा पेपरला बातमी देऊन मर्जीतील ठेकेदार यांना कामे देऊन मोठा भ्रष्टाचार होत आहे. लोकल पेपरला बातमी दिलेली माहिती गावकऱ्यांना देण्यात येत नाही.
आपणास ग्रामस्थ हातगाव यांच्यावतीने विनंती करण्यात येते की, तीन लाखांच्या आतील कामांची ई निविदा करण्यात यावी. ठेकेदारामध्ये स्पर्धा होऊन काम कमी रकमेत ठेकेदार घेतील व उर्वरित पैशाने शासनाचा फायदा होईल. गावचा विकास त्यावरील पैशांमध्ये होईल. हातगाव ग्रामपंचायत यांच्या अंतर्गत येणाऱ्या कामांना ऑनलाइन ई निविदा करूनच कामे वाटप करावीत. ग्रामसभेत कळविले शिवाय कोणत्याही कामाचे टेंडर करू नयेत. असे न केल्यास हुकूमशाही पद्धतीने आपण लोकल पेपर ला बातमी देऊन भ्रष्टाचार केला तर हातगाव ग्रामस्थ यांना नाविलाजाने बेमुदत उपोषणास बसावे लागेल. याची नोंद घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...