चांदा
नेवासा तालुक्यातील चांदा येथे चार दिवसाच्या खंडानंतर काल रात्री पुन्हा दोन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सोने , चांदी , रोख रक्कम लंपास केली आहे. एकाच आठवडयात दोनदा चोऱ्या करून चोरट्यांनी चांदयात चांगलीच दहशत निर्माण केली असल्याने ग्रामस्थात प्रचंड घबराट पसरली असून पोलिसांनी चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.
गत रविवारी चार एप्रिल रोजी गावातीलच रावसाहेब दिवटे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून नऊ ते दहा तोळे सोने काही चांदी तसेच रोख रक्कम चोरटयांनी लांबविली होती. या घटनेतून गाव सावरते न सावरते तोच काल रात्री गावातील दोन ठिकाणी चोरट्यांनी पुन्हा घरफोडी केल्याने ग्रामस्थांत मोठी घबराट पसरली आहे त्याचबरोबर पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
काल बुधवार दिनांक सात एप्रिल रोजी रात्री एक ते तीनच्या वाजेच्या सुमारास चोरट्यांनी गावच्या पुर्वेस चर्च परीसरातील निलेश दिलीप पंडीत आपल्या घरात झोपले होते त्या ठिकाणी चोरट्यांनी खिडकीतून आत प्रवेश केला आतमध्ये जाऊन बाहेरचा दरवाजा उघडला त्यानी श्री पंडीत व त्यांचे कुटुंब झोपले होते त्या खोलीतील कपाटाची उचकापाचक करून त्यातील पर्समध्ये ठेवलेल्या दुसऱ्या कपाटाच्या चाव्या घेऊन दुसरे कपाट उघडून त्याची उचकापाचक करत दोन अंगठ्या मंगळसुत्र आदि मिळून सव्वादोन तोळे सोने लहान मुलांच्या पट्टया , बाळी ,कडे अशा चांदिच्या वस्तू घेऊन पोबारा केला अशी माहिती निलेश पंडीत यांनी दिली.
ही घटना पंडीत यांच्या लक्षात तीन वाजेच्या दरम्यान आली त्यांनी तातडीने गावचे पोलिस पाटिल कैलास अभिनव यांना सांगितली त्यानीही लगेच सोनई पोलिस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली मात्र तोपर्यंत चोरट्यांनी आपला मोर्चा गावच्या दक्षिणेस कुभार गल्लीकडे वळवला होता त्या ठिकाणी श्रीदत्त साधकाश्रमालगत राहत असलेल्या आदिनाथ दत्तात्रय धुमाळ यांच्याकडे चोरट्यांनी डाव साधला त्याच्या घरात जाऊन कपाटाची उचकापाचक करत काही रोख रक्कम त्यांच्या हाती लागली तर त्याचखोलीत झोपलेल्या त्यांच्या आजीची डब्यात ठेवलेली गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत लंपास केली.
आदिनाथ धुमाळ यांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी पोलिस पाटील कैलास अभिनव यांचे घर गाठले तोपर्यंत सोनई पोलिसांची टिमही श्री पंडीत याच्याकडे पोहचली होती धुमाळ यांनी झालेला प्रकार त्यांच्या कानावर घातला श्री पंडीत व श्री धुमाळ यांच्या घरी जाऊन पोलिसांनी झालेल्या प्रकाराची पाहणी केली.
सोनई पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी घटनेचे गांभिर्य ओळखत सकाळीच नगरच्या श्वानपथकाला तसेच ठसे तज्ञाना पाचारण करून काही धागेदोरे मिळतात याची शहानिशा केली त्यांच्या सोबत हे कॉ बाबा वाघमोडे, हे. कॉ . गावडेसह पोलिस पथक होमगार्ड पथक हजर होते. एकाच आठवडयात सलग घडलेल्या घटनेमुळे चांदा परीसर हादरून गेला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालु होते.
श्री. रामचंद्र कर्पे
पोलिस निरीक्षक
अरुण सोनकर
चांदा



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...