हुंडा नको सोयरे; फक्त पोरगी द्या - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

हुंडा नको सोयरे; फक्त पोरगी द्या

लॉकडाउन मुळे वर पित्याची होते दमछाक, लग्न तिथी रद्द
 
पैठण / किरण काळे, जलभूमी वृत्तसेवा 
 गेल्या वर्षी लग्नसराईच्या तोंडावर कोरोनाचे महाभयानक संकट असल्याने वयात आलेल्या अनेक तरुण-तरुणींचे लग्न होऊ शकले नाही. धुमधडाक्यात लग्न करु इच्छिणाऱ्या जवळपास सर्वच वधु-वर पित्यांना काढलेली तिथी रद्द करावी लागली होती. पुढच्या वर्षी आपल्या मुलांची लग्न धुमधडाक्यात करुन त्यांचे हात पिवळे करु, अशा बेतात असलेल्या वधुवर पित्यांना कोरोनाच्या कमबॅकने पुन्हा झटका दिल्याने त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. 
 


 
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात होणाऱ्या लग्न कार्यावर नियम व अटीचे बंधने घातली आहेत. शिवाय रजिस्ट्रेड मॅरेजचा पर्याय खुला केला आहे. राज्यात अनलॉक सुरु झाल्यानंतर सर्व परिस्थिती पुर्व पदावर येत असल्याने लग्नाच्या बेडीत अडकवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार बसलेल्या अनेक वधु, वरांना पुन्हा लॉकडाउन सुरु झाल्याने हिरमोड झाला आहे.
वय वाढत असल्याने चिंता 
 सलग दोन वर्षांपासून लग्न सोहळ्यावर कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने प्रशासनाने बंधने घातली असल्याने नाईलाजाने काढलेली तिथ रद्द करुन लग्न पुढे ढकलावी लागत असल्याने अनेक तरुण, तरुणी ऐज बार होत असून ज्यांची लग्न ठरलेली आहे. त्याचे ठिक आहे, मात्र ज्यांना लग्न ठरवायचे आहेत. त्यांना वय वाढत असल्याने चांगला जोडीदार मिळणे अवघड झाले आहे. असे वधु - वर चिंतेत दिसत आहेत. 
 
हुंडा नको फक्त मुलगी द्या

मानपानाचा विचार केला तर वर पित्याकडून वरदक्षिणा, मानपान, कपडे, भांडी, अगदी सुईपासून सर्व संसारची मागणी केली जात असे. परंतू सध्या दोन वर्षांपासून लग्नसराईवर कोरोनाचे सावट असल्याने नाते जमविण्यासाठी हुंडा नको फक्त मुलगी द्या, अशी मागणी नवरदेव  वधू पित्याकडे करताना दिसत आहे.

 

लॉकडाउनचा असाही फायदा

समाजात आज ही अनेक जण वधु पक्षाकडे हुंड्याची तर मागणी करतातच शिवाय चागले मंगल कार्यालय, ऐवढ्या लोकांची जेवणाची व्यवस्था अशा विविध मागण्या करीत होते. मात्र लॉकडाउनमुळे वर पक्षाकडून फक्त आम्ही घरातील मोजके लोकच येऊन वधूला घेऊन जाऊ असे सांगून एकदिवसीय (वन डे) लग्नावर भर देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...