महावितरण कंपणीत एजन्सी काम वाटपात सावळा गोंधळ - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

रविवार, १८ एप्रिल, २०२१

महावितरण कंपणीत एजन्सी काम वाटपात सावळा गोंधळ

कोविड चा वाढता प्रादूर्भाव ओसरताच महावितरनला टेंडर शॉक बसणार
 
संदिप आसणे 
माळवाडगांव / जलभूमी वृत्तसेवा 
 
एनएससी एम्पालनमेंटअंतर्गत एजन्सीला काम वाटपात झालेल्या अनियमितता व भ्रष्टचाराबाबत चौकशी करण्यात यावी. असे निवेदन महावितरण श्रीरामपूरचे कार्यकारी अभियंताना अनिल थोरतांना यांना अखिल भारतीय छावा चे जिल्हा अध्यक्ष नितीन पटारे यांनी देवून महावितरण कंपणीचा सावळा गोंधळ उघडकीस आणणार असल्याचे सांगितले. 
 

श्रीरामपूर महावितरण विभागात एजन्सी काम वाटपात सावळ्या गोंधळाची चौकशी करण्यात यावी.अशी मागणी छावा संघटनेने एका निवेदनाद्वारे केली आहे. 
( छाया - जलभूमी सेवा, श्रीरामपूर )

श्रीरामपूर महावितरण विभागात एनएससी एम्पालनमेंट अंतर्गत ई-निविदा राबवण्यात आली होती, सदर निविदेत गट क्रमांक 24 / ( l ) नुसार आपले स्थरावरून उपविभागात एजन्सीना पात्र ठरविण्यात आले होते. ठरवून दिलेल्या उपविभागात DPDC किंवा अन्य श्रोताद्वारे NSC स्कीम अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतून समनधित उपविभागातील एनएससी एम्पालनमेंट अंतर्गत एजन्सीना निविदेनुसार रोटेशन पद्धतीने समान कामाचे वाटप करणे आवश्यक होते, परंतु आजपर्यत एनएससी एम्पालनमेंट स्कीम अंतर्गत उपलबध झालेल्या निधीतून समनधित उपविभागात एजन्सीना काम वाटपात मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टचार झाला आहे. तरी या प्रकरणी चौकशी करून बेरोजगार ठेकेदार युवकांना न्याय द्यावा. 
 
अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना तीव्र आंदोलन छेडेल असे निवेदनात म्हटले आहे.पटारे यांनी फोनवर माहिती विचारली असता अनिल थोरात भडकले. असली माहिती ऑफिसात येऊन विचारा. कोरोनामुळे सरकारी कार्यालयात येण्यास बंदी आहे. सरकारी जी आर वाचला नाही का ? असे उध्दट उत्तर देण्यात आली. दरम्यान सर्व पुरावे घेऊन कोविड टेस्ट करून मग ऑफिसात येतो.असे छावाचे जिल्हा अध्यक्ष यांनी म्हणताच मी सोमवारी ऑफिसला नाही. लेखी निवेदन द्या. तुमच्याकडे अपूर्ण माहिती आहे. 
 
असे म्हणत वेळ टाळून नेली, छावाचे जिल्हा अध्यक्ष नितीन पटारे , शहर अध्यक्ष शरद बोंबले, एकलव्य चे सुभाष मोरे यांनी सहायक अभियंता क्षीरसागर यांना निवेदन देऊन NSC च्या इंप्यानल टेंडरचे समान वाटप न झाल्याची लेखी तक्रार करत याप्रकरणी चौकशी ची मागणी केली आहे. कोविड चा वाढता प्रादूर्भाव ओसरताच महावितरनला टेंडर शॉक बसणार आहे. यामध्ये अनेक मोठे अधिकारी गुंतले असून मुख्य अभियंता नासिक यांच्याकडे या प्रकरणी आता दाद मागणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी दिली. एकीकडे शेतकऱ्यांना दोन- तीन हजार रुपये बिल भरलं नाही म्हणून वीज तोडून वेठीस धरायच. 
 
दुसरीकडे वीज जोडणी , देखभाल दुरुस्ती चे टेंडर देताना अनियमितता करून मर्जीतील ठेकेदारांना लाखो रुपयांचे टेंडर नियमबाह्य प्यानालला समान वाटप नियम डावलून करायचे. हा प्रकार गंभीर असून निवेदनातच टेंडर आय डी सह पुरावा दिला आहे. आता चौकशी होतेय का? अधिकारी अनियमियते बाबत कारवाईस सामोरे जातात. हे बघायचे आहे, निवेदनावर अखिल भारतीय छावा चे जिल्हा अध्यक्ष नितीन पटारे यांची सही आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...