महात्मा फुले यांचे शिक्षण,शेतकरी कल्याणकारी विचार रुजणे गरजेचे - पत्रकार प्रकाश कुलथे - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

रविवार, ११ एप्रिल, २०२१

महात्मा फुले यांचे शिक्षण,शेतकरी कल्याणकारी विचार रुजणे गरजेचे - पत्रकार प्रकाश कुलथे

भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी.

 

श्रीरामपूर /जल भूमी

 

महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1883 मध्ये लिहिलेल्या "शेतकऱ्यांचा आसूड "या ग्रंथातील विचार आणि त्यांची लोककल्याणकारी  शिक्षणप्रणाली आजच्या काळात रुजली तर शेतकरी सुखी होईल. शिक्षणविचारातून आजची बेरोजगारी निघून जाईल असे मत महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे यांनी व्यक्त केले. 

 


 

वाचन संस्कृती प्रतिष्ठान हॉलमध्ये भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची 194 वी जयंती विविध उपक्रमांनी ऑनलाईन साजरी करण्यात आली, यावेळी प्रतिमापूजन, उदघाट्नपर भाषणात पत्रकार प्रकाश कुलथे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून  साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, पुणे येथील श्रीरामचंद्र अभियांत्रिकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश देसाई, प्रमुख वक्ते म्हणून कवयित्री सौ. संगीता अशोकराव कटारे ,फासाटे,अध्यक्षस्थानी अँँड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य तुळशीराम शेळके उपस्थित होते. पुणे येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्र महाविद्यालयातील प्रा. डॉ. बाळासाहेब मुरादे, प्रा. डॉ. सुलभा पाटील, प्रा. अमोल चावंडे अभियांत्रिकी कॉलेजातील प्रा.डॉ. स्वेता मिश्रा, सर्व स्टाफ तसेच वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये,खजिनदार सौ. मंदाकिनी उपाध्ये, सचिव सौ. आरती उपाध्ये आदी उपस्थित होते. भूमी फॉउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष प्रा.कैलास पवार यांनी संयोजक म्हणून स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. 

 

सौ. संगीता कटारे. फासाटे यांनी 'महात्मा फुले यांचे कार्य व विचार 'याविषयी विवेचन केले. स्त्रीशिक्षण व सर्वसामान्य लोकांचे कल्याण करायचे असेल तर म. फुले यांचे विचार कृतीत दिसलें पाहिजेअसे सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी तृतीय रत्न, शिवाजी महाराजांचा पोवाडा, गुलामगिरी. शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांचा परिचय करून दिला.प्राचार्य डॉ. अविनाश देसाई यांनी भूमी फॉउंडेन्शनच्या समाजसेवी कार्याला शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष भाषणात प्राचार्य टी. ई. शेळके यांनी आजचे शेती , शेतकरी जीवनातील अर्थशास्र उपयोगात आणले पाहिजे, प्रा. पवार यांनी म. फुले जयंतीचे औचित्य समजून घ्यावे असे सांगितले. भूमी फौंडेशनचे बाबासाहेब चेडे, भीमराव बागुल, सौ. पवार आदिंनी नियोजन केले. प्रा.कैलास पवार यांनी समारोप करून आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...