श्रीरामपूर / जलभूमी
श्रीरामपूर ग्रामिण रुग्णालयात कोविड लसीकरणाची सुविधा उपलब्ध झाली खरी मात्र हे रुग्णालय शहरापासून तीन ते पाच किलोमीटर अंतरावर शिरसगांव हद्दीत आहे. शहरातील नागरीकांना लस घेणेकामी याठिकाणी रिक्षाने जावे लागत असल्याने रिक्षाचे भाडे परवडत नाही.
शहरातच कोविड लस सुविधा केंद्र सुरु करण्यात यावे. अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते जाफरभाई शहा यांच्यासह इतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार लहुजी कानडे, नगराध्यक्षां अनुराधाताई आदीक यांच्याकडे केली होती, या मागणीची आमदार लहुजी कानडे, नगराध्यक्षां अनुराधाताई आदीक यांनी तात्काळ दखल घेऊन शहरातच कोविड लस सुविधा केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्यांसह शहरवासीयांच्या वतीने आमदार, नगराध्यक्षा यांचे अभिनंदन केले जात आहे. शहरातील मोठ्या लोकसंख्येला विचारात घेता वॉर्ड नं.२ साठी उप आरोग्य केंद्र देखील लवकरात लवकर सुरु करावे. अशी मागणीही यावेळी सामाजिक कार्यकर्ते जाफर शाह याच्याकडून करण्यात आली आहे.
लोकसंख्येच्या मानाने सगळ्यात मोठा वॉर्ड असलेल्या श्रीरामपूर शहरातील वार्ड नं.२ मध्ये एकूण बारा प्रभागे येतात, लोकसंख्येच्या मानाने वॉर्ड नं. २ मोठा वॉर्ड आहे. याठिकाणी सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे, वॉर्ड नं. २ मध्ये गरीब, हातावर पोट असणारे, रोज कमावून खाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. परिस्थिती हालाकीची असल्यामुळे आरोग्याची समस्या, आरोग्याकडे दुर्लक्ष होणारच. खाजगी डॉक्टर व त्यांनी दिलेले औषध- गोळ्यांचे पैसे नक्कीच गरिबांच्या खिशाला परवडणारे नाहीत.
शहरात पालिकेचे रुग्णालये आहे मात्र ते वॉर्ड नं. २ पासून दूर असल्यामुळे गरीब लोकांकडे स्वतःचे खाजगी वाहन नाही, भाडोत्री रिक्षा त्यांना परवडणारे नसल्याने त्यांना आपल्या आरोग्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करणे भाग पडते. वॉर्ड नं. २ सारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या वार्डात धनगर वस्तीजवळ पालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास, त्याचा फायदा फक्त वॉर्ड नं.२ साठीच नव्हेतर लगतचा परिसर संजयनगर, गोपीनाथनगर, रामनगर, रमानगर इतर भागातील नागरीकांना देखील होणार आहे. त्यामुळे आपल्या तालुक्याचे आमदार लहू कानडे, शहराच्या कर्तबगार नगराध्यक्षा अनुराधाताई आदीक यांनी जातीने लक्ष घालून समस्त जनतेच्या भावनेचा व ज्वलंंत समस्येचा विचार करून लवकरात लवकर वॉर्ड नं.२ मध्ये उप आरोग्य केंद्राचा निर्णय घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जफरभाई शहा यांंच्यासह इतर सामाजिक कार्यकर्ते आणि परीसरातील नागरीकांकडून करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...