माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, २४ एप्रिल, २०२१

माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

सरपंच पांडुरंग नागरगोजे यांना पितृशोक
 
नितिन भोंडवे 
पाटोदा / जलभूमी वृत्तसेवा 
 
पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी येथील रहिवाशी सरपंच तथा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पाडुरंग नागरगोजे यांचे वडील दादाराव आश्रुबा नागरगोजे यांचे नुकतेच हृदय विकाराने निधन झाले. 
 
 
मृत्युसमयी त्यांचे वय ७५ वर्ष होते. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात सोशल डिस्टन्स ठेवत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीस माजी मंत्री पंकजाताई मुंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सभापती सुवर्णाताई लांबरुड, उपसभापती देविदास शेंडगे, काकासाहेब लांबस्ड, आप्पासाहेब राख, विजय गोल्हार, सुधीर घुमरे, मधुकर गर्जे, महेंद्र गर्जे, संजय मिसाळ, दिपक तांबे, संतोष राख, शाम हुले, लल्लु शाह यांच्यासह त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, तसेच सामाजीक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नागरीक उपस्थीत होते. 
 
उपस्थीतांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नागरगोजे कुटुंंबाच्या दुःखात जल भूमी परिवार सहभागी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...