ईश्वर वाघमारे यांची मागणी
शिवम् जाधव
शेवगांव / जलभूमी वृत्तसेवा
अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुतार व्यवसाय करणारे सुतार कामगार आहेत . स्वतःची मशीन घेऊन लाकडांना आकार देऊन आपला घर गाडा चालवण्यासाठी ते परिश्रम घेत आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून त्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
सुतार कामगारांसाठी देखील शासनाने स्वतंत्र आर्थिक पॅकेत द्यावे. अशी मागणी शेवगांव तालुक्यातील आखतवाडे येथील ईश्वर वाघमारे यांनी केली.
वाघमारे यांनी म्हटले आहे की, अनेक कारागीर वर्षानुवर्षे सुतार काम करुन घराचा गाडा चालवतात. घराच्या खिडकी , खुर्ची , दरवाजे , पाट यासह घरातील विविध वस्तु सुतार कामगार बनवितात . स्वतःची मशीन असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मशीन ला वीज लागते आणि वीजबिलही अव्वाच्या सव्वा येते .
परंतु सुतार कामगारांना मोबदला अल्प मिळतो त्यात घरसंसार , मुलांचे शिक्षण , दवाखाना हे भागविणे कठीण होते. अनेक मजुरांसाठी शासनाने स्वतंत्र पॅकेजजीची निर्मिती केली आहे. परंतु सुतार व्यवसायिक आजही संकटात आहे . लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . त्यामुळे शासनाने सुतार व्यवसायिक कामगारांना स्वतंत्र पॅकेजमधून आर्थिक मदत द्यावी , अशी मागणी ईश्वर वाघमारे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...