ऑक्सिजन गॅस उत्पादक कंपनीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, २४ एप्रिल, २०२१

ऑक्सिजन गॅस उत्पादक कंपनीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी भेट देऊन कंपनीचे कौतुक
 
कुकाणा / जलभूमी वृत्तसेवा 
 
नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील लोचनाबाई ऑक्सिजन व नायट्रोजन गॅस उत्पादक कंपनीस अनेक पदाधिकारी, अधिका-यांनी भेटी देवून कंपनीचे कामकाज पाहून समाधान व्यक्त करून कौतुक केले. 
 
 
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ऑक्सिजन गॅस उत्पादक कंपनीस भेटी प्रसंगी लोकनियुक्त सरपंच प्रा. भाऊसाहेब सावंत स्वाागत करून सत्कार केला. यावेळी कंपनीचे मालक बी.डी.पुरी, आशिष पुरी व अभिजीत लुणिया आदी. 
( छाया - दैनिक जलभूमी सेवा )
 
नेवासा विधानसभेचे ना. शंकरराव गडाख यांनी ऑक्सिजन गॅस उत्पादक कंपनीस भेट दिली. त्यापाठोपाठ शनिवारी दि. २४ रोजी अहमदनगर जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी भेट देऊन कौतुक करून समाधान व्यक्त केले. शेवगांव च्या तहसीलदार सौ. अर्चना पागिरे/ भाकड, नायब तहसीलदार मयुर बेरड यांनी भेटी देवून पाहणी केली. कोरोना महामारीत ऑक्सिजन गॅस उत्पादक कंपनीस महत्त्व आले. 
 
ग्रामीण भागात ही कंपनी उभी करून अडचणींच्या वेळी जिल्ह्यात नावारूपाला आली. आलेल्या सर्व पदाधिकारी, अधिका-यांचे चिलेखनवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच प्रा. भाऊसाहेब सावंत स्वाागत करत आहेत. यावेळी कंपनीचे मालक बी.डी.पुरी, आशिष पुरी व अभिजीत लुणिया आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...