राहुरी / भाऊ कदम, जलभूमी वृत्तसेवा
राहुरी शहरात कोरोना थैमान घातले असल्याने, शहरातील पेशंटची परिस्थिती खूपच गंभीर होत चाललेली आहे. वाढत चाललेली रुग्ण संख्येला थांबविण्याचे मोठे आवाहन तालुका प्रशासनापुढे ठाकले आहे. राहुरीचे तहसीलदार शेख यांनी आघाडी सरकारच्या लॉकडाऊनची वाट न बघता दि. १५ फेब्रुवारीपासून ते दि. २१ फेब्रुवारीपर्यंत सात दिवसांचा अत्यावश्यक सेवा वगळता कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
तहसीलदार शेख आमच्या जलभूमी प्रतिनिधी शी बोलताना म्हणाले की, दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरवासियांना लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्या संदर्भात व्यापारी संघटनेची नुकतीच बैठक संपन्न झाली. बैठकीत राहुरी शहरातील दवाखाने, मेडिकल २४ तास चालू राहतील. मात्र बाजा पेठेत असलेली मेडिकलवर निर्बंध घालत सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत चालू राहतील.
पतसंस्था, बँका नेहमीप्रमाणे चालू राहतील. भाजीपाल्याचे व्यवहार सकाळी ७ ते ११ यावेळेत चालू राहतील. शहरामध्ये कलम १४४ लागू आहे. शहरातील नागरिकांनी, व्यापारी बांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेवून प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन तहसीलदार शेख यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...