दैनिक जलभूमी डिजिटल अंकाचे वेबसाईटवर प्रकाशन करुन शुभारंभ - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

दैनिक जलभूमी डिजिटल अंकाचे वेबसाईटवर प्रकाशन करुन शुभारंभ

डिजीटल अंकाचे उत्साहात स्वागत, सोशल मीडियावर शुभेच्छाचा वर्षाव

 

शेवगांव / जल भूमी


माझ्या जिवीची आवडी ।
पंढरपूरा नेईन गुढी।।
पांडुरंगी मन रंगले।
गोविंदाचे गुणी वेधले।।


या प्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ग्रामीण भागातील आवाज असणाऱ्या दैनिक जलभूमी अंकाचे डिजिटल स्वरूपात पदार्पण झाले असून कोरोना परीस्थितीत सोशल डिस्टंसचा विचार करून दैनिक जल भूमी डिजिटल अंकाचे पाहुण्यांच्या हस्ते डिजिटल वेबसाईटवर प्रकाशन करुन शुभारंभ सोहळा संपन्न झाला.



कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी सोशल मीडियावर दैनिक जलभूमी अंकाचे स्वागत करून शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी मुख्य मार्गदर्शक बाळासाहेब जाधव, निवासी संपादक शंकरराव मरकड, प्रमुख पाहुणे सर्वश्री ॲड. प्रदिप ढोले, संदीप बामदळे, राजेंद्र आढाव, राहुल व्यवहारे, मुकुंद जमधडे, विठ्ठल आढाव, अशोक दुकळे, विलास फाटके, संजय फाटके, अशोकराव देवढे, अशोक पंडित, हरी जाधव, कृष्णा जाधव, विठ्ठल फटांगरे, अविराज जाधव, पांडुरंग गायकवाड, गणपत आढाव, दादा सावंत, शहादेव सांगळे, एकनाथ बर्डे, सुनील सामृत, दत्ता जाधव, पत्रकार मोरे, दिपक खोसे,रामनाथ रुईकर, सुनील रणमले, सोपान जाधव, सलीम शेख, आदींसह नागरीक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...