मुंबई
कोरोना -१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दि. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत म्हणजे पाच महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दि. ३१ ऑगस्ट २०२१पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. एक वर्षापासून कोरोना प्रादुर्भाव असल्याने निवडणूका लांबणीवर पडत आहे. मुदत संपल्यावर प्रशासकाची नेमणूक होणे गरजेचे असताना सहकारी खाते मात्र याबाबत डोळेझाक करत आहे. त्यामुळे संस्थेमध्ये आर्थिक अफरातफर होण्याची भिती सभिसदामधून व्यक्त होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मुदत संपलेल्या संस्थेवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही होणे गरजेचे आहे अशी मागणी सभासदामधून जोर धरत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...