नेवासा
मराठा समाजातील प्रत्येक घटकांना न्याय मिळवून देत असल्याने स्वाभिमानी मराठा महासंघाचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत शिवसेना नेवासा तालुका उपाध्यक्ष रावसाहेब कावरे यांनी व्यक्त केले.
शिवसेना नेवासा तालुका उपप्रमुख व स्वाभिमानी मराठा महासंघाचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील कावरे हे नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असतात. गोरगरीब, दिनदलीतांना मदत करुन अनेकांचे प्रश्न मार्गी लावले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा अर्चना धुळे, प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे युवकचे प्र. अध्यक्ष कैलास रिधे, महिला जिल्हा कार्याध्यक्षा मनिषा फडताडे, कल्पना शेटे, जिल्हा अध्यक्ष अकुंश डाभें, समितीचे गणेश झगरे, किशोर लोढे, निलेश बारहाते, अमोल म्हस्के यांच्या सह स्वाभिमानी मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...