साखर कारखान्याने उस तोडणी कामगारांची संख्या वाढवावी, शेतकऱ्यांची मागणी - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

साखर कारखान्याने उस तोडणी कामगारांची संख्या वाढवावी, शेतकऱ्यांची मागणी

उन्हाच्या तीव्रतेने उसाच्या होताहेत खोडक्या


भातकुडगांव


शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव परिसरात मोठ्या प्रमाणात गळतीसाठी उस उभा आहे. साखर कारखाना प्रशासनाने उस तोडणी मजूरांची संख्या वाढवून उसाचे गळीत लवकरात लवकर करण्यात यावे. अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. उन्हाच्या तीव्रतेने उसाच्या खोडक्या होण्याची भिती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

 

shetkaryanchi magni
शेवगांव तालुक्यातील बक्तरपूर येथील तरुण शेतकरी दिपक सामृत हा स्वतः च्या उसाचे कसे नुकसान होत आहे? हे दाखवताना
(छाया - शिवम् जाधव)

शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव, भायगाव, बक्तरपूर, मजलेशहर, शहरटाकळी, देवटाकळी, हिंगणगांव, जोहरापूर ही गावे गंगामाई, केदारेश्वर, ज्ञानेश्वर, वृध्देश्वर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. हे सर्व कारखाने उस लागवड नोंदी घेतांना आमचे कार्यक्षेत्र आहे असा हक्क दाखवून नोंदी घेतल्या जातात. मात्र उस गळीतावेळी या गटाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.


कार्यक्षेत्रातील उसाला गळीतास प्राधान्य देण्याएैवजी बाहेरील उस आणण्यात कारखाना प्रशासन धन्यता मानतात. या गटामध्ये उस तोडणी मजूराची संख्या अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे आँक्टोबर मधील नोंद असणा-या उस गळीतास चालू आहे. त्यानंतर ही मोठ्या प्रमाणात नोंदी असल्याने उस गळीतास जातो की नाही अशी भिती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.


दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने उस तोडणी मजूर किती दिवस थांबतात. जर हे मजूर गावाकडे निघून गेल्यास उस गळीताचा मोठा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे साखर कारखाना प्रशासनाने तातडीने उस तोडणी मजूराची संख्या वाढवून कार्यक्षेत्रातील उस गळीतास प्राधान्य द्यावे. तरच आपला हक्क या कार्यक्षेत्रावर सांगावा. अशा संतप्त प्रतिक्रिया या भागातील शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.


साखर कारखाना प्रशासनाच पत्र नावालाच

साखर कारखाना प्रशासनाने मोठ्या दिमाखात शेतकरी व उस तोडणी मजूरासाठी निवेदन प्रसिध्द केले. त्यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की, ऊस तोडीसाठी कोणत्याही शेतकऱ्यांनी पैसे देवू नये? व उस तोडणी मजूरांनीही उस तोडीसाठी पैसे घेवू नये? मात्र उस तोडणी मजूर एकरी पाच ते दहा हजार रुपये घेतल्याशिवाय उसाला कोयता लावत नाही. या संदर्भात साखर कारखाना प्रशासनाकडे तक्रारी जात असताना दुर्लक्ष केले जात आहे. या बाबीकडे कुणी लक्ष देईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.यामधून शेतकऱ्यांची सुटका कधी होईल.

पैशाअभावी उस तोडणी मजूरांकडून अडवणूक केली जात असेल तर आम्हाला मो. ९८३४९६७७६७ या क्रमांकावर किंवा jalbhuminews@gmail.com या मेलवर कळवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...