चांदा / प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील चांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत कोवीड १९ प्रतिबंध लसीचा डोस आतापर्यंत १o३४ [ एक हजार चौतीस] जणांना देण्यात आले असून महिलांनी लस घेण्यामध्ये उस्फुर्त सहभाग घेतला आहे.
चांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अर्तंगत एकूण १६ गावे येतात गेल्या महिन्यातील आठ मार्चपासून येथे लसीकरण सुरु झाले होते तेव्हापासून आज नऊ एप्रिल अखेरपर्यंत १०३४ जणांनी ही लस घेतली असल्याची माहिती केंद्राचे प्रमुख डॉ .रजनिकांत पुंड यांनी दिली आहे.
सुरुवातीला फक्त साठ वर्षावरील नागरीक तसेच ४५ वर्षा पुढील आजारी नागरीकांनाही लस मोफत दिली जात होती त्यानंतर आता पंचेचाळीसच्या पुढील सर्वांनाच लस दिली जात आहे आतापर्यंत लस घेतलेल्या सर्वांनीच ही लस सुरक्षित असल्याचा अनुभव सांगितल्याने आता महिलांसह नागरीकांची लस घे०याकडे कल वाढला आहे . या विषयी डॉ . पुंड यांनी सांगितले की कोवीड१९ प्रतिबंधीत लस ही पुर्ण सुरक्षित आहे.
लस नोंदणी करण आपल्या स्वतःच्या अॅपवरूनही करता येते किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी येथे केंद्रावर आल्यानंतर त्यांचे नोंदणी करून लसीकरण केले जात आहे येताना तोंडाला मास्क लाऊनच यावे तसेच आधार कार्ड सोबत आणावे. मात्र कोरोनाचा वाढता पार्दुभाव पाहता नागरीकांनी स्वतःची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे मास्कचा वापर , स्वच्छ हात धुणे , शासन नियमांचे पालन करत सार्वजनिक ठिकाणी विमा कामाचेफिरु नये असे आवाहन त्यांनी केले आहे
अरूण सोनकर


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...