स्पर्धेसाठी सोशल मिडियातुन शुभेच्छा वर्षाव, साई फाऊंडेशनतर्फे सत्कार
शेवगांव
शेवगांव तालुक्यातील दहिगांव- ने येथील सुपुत्र, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू, गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकावणारा, तरुण पिढीचा आदर्श श्रीकांत दत्तात्रय जाधव यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय रेल्वे संघाकडून निवड झाली. या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल दहिगांव - ने येथे साई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अरुण पवार यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
श्रीकांत जाधव यांचा सत्कार करताना साई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अरुण पवार
या खेळाडुमुळे दहिगांवच नाव राष्ट्रीय पातळीवर झळकल असल्याची प्रतिक्रिया डॉ. पवार यांनी जल भूमी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. पै. जाधव यांना क्रिडा शिक्षक समता क्लबचे प्रमुख प्रा. शिवाजी वाबळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...